लागीर ४८ तिच्या पोटाकडे बोट दाखवून आक्कांनी खुणेनं पुन्हा तोच प्रश्न विचारला, आणि ल्यूसी मिटल्या ओठांनी भरल्या नेत्रांनी खाली नजर लावून चालू लागली. त्या रात्रीच डॅनी - मर्सी आणि आक्कांचा पुढचा बेत पक्का झाला. मर्सीच्या माहेरच्या नात्यातली ल्युसी दूरची नातेवाईक होती त्यामुळे बेत रचताना डॅनी विचाराने पक्का होता पण मर्सीच्या काळजात तुटत होतं. म्हणूनच ल्यूसीला रेल्वेस्टेशनवर पोहचवण्याची जबाबदारी आक्कांनी स्वतःवर घेतली. ल्यूसीला मद्रासला पाठवून डॅनी-मर्सीचे कुटुंब त्या संकटातून मुक्त होणार होते. ल्यूसीचे पुढे काय होणार हा प्रश्न मर्सीला गुदमरुन टाकत होता; पण स्वसुखार्थ ती सावधपणें कठोर झालेली होती. मधूनच ती भावविवश होऊन म्हणाली, 'वचपनसेही ल्यूसी लावारीश जैसी रही। श्रमके बदले में उसे जिंदगी मिल गयी । कैसी जिंदगी ये ? किसीके गन्दी वासनाकी वो शिकार बन गयी। दुनियामें कोई नही है उसका । सहारा तो मेरा था लेकिन मै • ओ गॉड कैसे मोडपर आये है हम? , मर्सी रडू लागली. आणि वैतागलेला डॅनी ओरडला, नॉन्सेन! स्टॉप Sty इट कहो ।' मर्सी! मम्मी, उसे अपनी कल्याणकी वात लांब लांब पाऊले टाकीत फॅक्टरीवर कामाला गेला. दुसऱ्या दिवशी आक्का डॅनीच्या घरात गेल्या. ल्यूसी पाळण्यात- ल्या बाळाला खेळवत होती. पापे घेत होती. प्लॅस्टीकच्या पिशवीत पोळी-भाजी घालून मर्सीने ल्यूसीचे बास्केट भरले. डॅनीने ल्यूसीचे रेल्वे तिकीट आणि तिच्यासाठी पैसे आक्कांजवळ दिले. आपल्या प्रस्थानाचे कारण, दिवस, वेळ ल्युसीला सांगितली होती. तिने तो बेत ऐकून नकार न देऊन मान्य केलेला होता. आतापर्यंतच्या रात्री तिने आक्कांच्या घरी घालविल्या; पण 'त्या' रात्रीपासून तिने हुंदका दिला नाही. तिच्या नजरेत तिचा आक्रोश व दुःख गोठून गेले होते. एवढे होऊनही तिने कोणाकडे दयेची भीक मागितली नव्हती. आक्कांना ते आक्रित वाटत होते आणि ढोंगही; म्हणूनच त्यांना तिची सहानुभूती वाटत नव्हती.
पान:लागीर.pdf/५५
Appearance