Jump to content

पान:लागीर.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'हमारी कास्टवाली छोरी अब आनेवाली है। मग बरं झालं. तुमचं रोजचं झंगाट संपल. ' आणि झालंही तसंच. मर्सीच्या घरी एक सतरा-अठरा वर्षाची पोरगी कामाला आली. भांडणाऐवजी हसणं-खिदळणं त्या कुटुंबात सुरु झालं. अधून-मधून उद्भवणाऱ्या 'त्या' चकमकी संपल्या. ल्यूसी घरकामात चलाख होती. जन्मापासून पोरकी. याच्या त्याच्या घरी वाढलेली. म्हणून सर्वांची मर्जी राखणारी. आक्कांच्या दोन पुतण्या जेव्हा गप्पागोष्टी करायच्या, तेव्हा ती तेथे येऊन मिसळायची. आता मर्सी फारच जडावली होती. ल्यूसी सारे घर आवरत असे. स्वैपाक, धुणी-भांडी, केरवारा अगदी चोख करीत होती. एक दिवस मर्सीच्या पोटात दुखू लागलं. तिला घेऊन डॅनी व ल्यूसी दवाखान्यात गेले. दवा- खान्यातून बाळाला घेऊन आल्यावर डॅनीने साऱ्या वस्तीत पेढे वाटले. वस्तीवर रात्री अपरात्री वाळाच्या रडण्याचा आवाज क्वचित यायचा, मात्र एका सकाळी पूर्वीसारखे डॅनी-मर्सीचे युद्ध सुरु झाल्याचा आवाज आला; पण लवकरच शांतता झाली. दोन-तीन दिवसांनी आक्का मर्सीला म्हणाल्या, (

  • आता का ग भांडतीस नवन्यासंग ? सुख दुखाय लागलं व्हय?

'मम्मी, मुझे गलत मत समझो। असे म्हणताना मर्सीचे निळे डोळे भरुन आले आणि तिने आपले दुःख आक्कांना सांगितले. ते ऐकून आक्कासुद्धा चक्रावल्या. साशंक झाल्या. म्हणाल्या, लागीर ४२ बाद डॅनीका अंदर जाना , कितीवेळा बघितलंस ग तू. चार वार देखा. पहला डिब्बा गिरनेका आवाज उसके आना, तुझा डेनी काय म्हंतो ? 'पयल्यांदीच नाय का तेला टोलवायचंस क्या? अग पयलं पायलं तवाच का बोलली नाय तू नवऱ्याला ? J 'मुझे भरोसा था डॅनीपर। आँखोपर विश्वास नही था। आता बसला व्यं? कपाळाचा भोग असतो बग ह्यो. आता >