पान:लागीर.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- नाहीतर तीही थोटकं ओढली असती! आता एक-पस्तीसची सुपर एक्सप्रेस येईल. हे हमाल झोप धुडकावून उठतील. हमालीसाठी पळतील. त्यांना पैसे मिळतील. प्रतिष्ठा नाही, पण पैसे तरी मिळतात. पोटापुरते, नशेपुरते! प्रतिष्ठेला काय कराचंय? आपल्या प्रतिष्ठेनं काय केलं? काय मिळवलं? आई तेवढी गमावली! आई! कधी भेटेल? तोपर्यंत असंच भटकायचं. त्यासाठी जगायला हवं. त्यासाठी काहीतरी खायला हवं. कुठून आणायचे पैसे? • हमाली केली तर? करावं का असं? काय हरकत आहे? - --- य करावं? आपला असा अवतार सकाळचे जेवण- कोणी ओळखणार नाही पैसे मिळतील - सिगारेट त्याची नजर पुन्हा पुन्हा त्या थोटकांकडे जात होती यची. गाडी- त्यानं आता ठरवलं होतं, सुपर एक्सप्रेस आली की हमाली मिळवा- आई भेटेपर्यंत असंच काहीतरी करत राहायचं ची शिट्टी झाली. हमाल पटापट उठले. तोही उभा होता बाजूने जावे, असा विचार मनात घोळत होता- कोणत्या गाडी स्टेशनला लागली. हमालांची धावाधाव झाली. तोही एका डब्याच्या दाराशी गेला आणि त्याच्या खांद्यावर घट्ट पकड़ पडली. त्याने मागे पाहिलं. गावचा रंगाशेठ होता. त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं तो त्याला काहीतरी म्हणाला व गर्दीतून वाजूला घेऊन आला. सखाराम अगदीच गांगरला होता. ( मला खरंच वाटलं नाही गड्या! म्हणलं, म्हातारी इकडं कशी? --- लागीर ३९ --- - कोण ? [C] आता आणिक कोण? तुझी आई रं, मागल्या ठेशनावर दिसली, पण गाडी हालली हुती. म्हणलं, सखाची आई नसलं माणसावाणी माणसं आसत्याती रग्गड J ' गाडीच हालली तर खात्री कशी करुन घेणार? हाक तरी कशी मारणार? बाकी काय बी म्हण गडया, पण माझ्या मनाला, जीवाला लई दुःख झालं. तुला इथं पायलं नि माझ्या मनाची खात्रीच झाली. उतरलो खाली, म्हणलं इचारावं तरी, सखा, काय असं तकदीर पालट-