पान:लागीर.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ३७ राजश्री, तू बोलू नकोस बरं.' इतका वेळ मुकस्तंभासारखा उभा असलेला सखा म्हणाला; तेव्हा आपली भाल्यासारखी तेज नजर क्षणभर भावावर रोखून, भावजयीवर तुच्छेतेचा कटाक्ष टाकून यमुनी त्याचवेळी निघून गेली. यमुनी गेल्यानंतर सखाराम फारच अस्वस्थ झाला. आई कुठं भलतीकडंच गेली, हे त्यास कळून चुकलं. विचारानं त्याचं मनं सैरभैर झालं. त्याची अन्नावरची वासना उडाली. झोप येईनाशी झाली आणि कशीतरी झोप लागलीच तर- सखा, हे आॠित हाय! या आईच्या शब्दानं त्याची झोप विच्छिन्न होऊन जाई. अशाच एका क्षणी तो जागा झाला. तेव्हा त्याला राजश्री टेबलाजवळ पत्र वाचत उभी असलेली दिसली. त्याला संशयही आला. झोपेच सोंग करुन तो पडून राहिला. सकाळी त्यानं राजश्रीची नजर चुकवून ड्रॉवरमधील ते पत्र शोधून काढून वाचले. त्याला आता सर्व गोष्टींचा उलगडा झाला होता; पण वेळ निघून गेली होती. दोन-तीन दिवस तो आईच्या नातेवाईकांकडे काही तपास लागतो का म्हणून फिरत राहिला. वर्तमानपत्रात 'हरवलेल्याचा शोध' अशी त्यानं बातमीही दिली. त्याला चुकलेल्या वासरासारखा सैरभैरपणा आला होता; पण तो वरुन शांत होता. राजश्रीलाही तो काही बोलला नव्हता. असाच तो एका दूरच्या नातेवाईवाकडून गावी परतला. त्याची छोटी मुलगीं हातात पत्र घेऊन पोष्टाच्या पेटीत टाकायला चालली होती. त्यानं तिलां हाक मारली. तिच्या हातातील पत्र पाहिलं. त्याच्या मेव्हण्याचा त्यावर पत्ता होता. त्यानं ते पत्र उघडून वाचलं व तो ते पत्र घेऊन तडक घराकडे आला. राजश्री स्वेटर विणत बसली होती. 'आनंदात आहेस ना? नवऱ्याचा प्रश्न ऐकून ती केवढ्यांदा तरी दचकली. त्याच्या चेहयाकडं पाहताच ती हादरली. पत्र टाकायला गेलेली पिंकी जवळच उभी. तिला शंका आली. भग्न नजरेनं तिनं त्याच्याकडं पाहिलं. त्याची नजर क्रूर श्वांपदासारखी झाली होती. त्यानं आपल्या खिशातून ते पत्र