Jump to content

पान:लागीर.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ३६ C आक्रंदून उठायचे. दोन-तीन दिवसांनीही आई आली नाही. तेव्हा ती यमुनीकडं मजेत राहिली असावी, या विचाराने तो मनात धुमसत राहिला. त्याची बायको राजश्री तर उघडपणे म्हातारीवर लबाड, चोरटी, स्वार्थी, भोंदू वगैरे शद्वांची उधळण करु लागली. सखारामही सुन्नपणानं ते सारं ऐकत होता. यमुनी अचानक घरी आलेली पाहताच सखाराम व त्याची बायको दोघेही चपापली. म्हातारी जाऊन आठदहा दिवस झाले होते. यमुनीला ती बातमी कुणाकडून तरी मिळाली होती, खरे-खोटे काय ते जाण- ण्यासाठी ती आली होती. आई येथून जाण्यापूर्वी घरात भांडण झाले होते व ती कोठे गेली हे कोणालाच माहिती नाही, हे कळल्यावर ती धाय मोलून रडू लागली. तिला राजश्री म्हणाली, 'हे पहा असा कांगावा बरा नव्हे. भरल्या घरात असा हा अभद्र- पणा करु नका. आमच्यावर थोडी संकटे कोसळीत का? माझंच चुकलं नाही का? आई मेली असं समजून मीच इथं यायला नको होतं. 1 आता तुम्हाला आई जगली काय नि मेली काय, व्हायचा तो लाभ तर झालाच आहे; शिवाय मायेचं नाटकही तुम्ही झक्कास वठव- लंत. तुमचं चुकलं असं म्हणेल? जा! मिळालेल्या चैन करा, जा. २ 'तोंड संभाळून बोल वहिनी ! तुमचा पैसा मला हवा तरी कशाला ? कसलं डबोल नि कोणी कोणास दिलं? स्पष्ट बोल! आईपेक्षा पैशाचं महात्म्य तुम्हांला अधिक वाटत होतं, तर मला सांगायचं होतं. मी गप्प होते, 'पैशानं आई विकत घेता येत नाही, ' म्हणून; पण तुम्ही तर तिला पैशासाठी हाकलीत. मला असं माहित असतं, तर मागाल ती रक्कम देऊन मी माझ्या आईला घेऊन गेले असते. तुमच्या नजरेला तिचं नखही दिसलं नसतं. तुमचं मन पापी नि डोळेही पापी. नुसता बोलण्याचा दिमाख नका दाखवू. तुम्ही जर पुण्यवान आहात आणि दौलतीचा तुम्हाला एवढा दिमाख आहे; तर आईसाठी आणलेली दौलत तरी काढा की पुढं ! 2 WWE