पान:लागीर.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गेली. उन्हात जाऊ नये, झाडावर चढू नये, नदीला पोहायला जाऊ नये म्हणून शपथा घालायची ती माझी आई आज माझ्या शद्वासाठी उन्हातून घर सोडून गेली. माझ्या डोळया देखत गेली. - - - न जेवता गेली. मी पण किती क्रूर! तिला जाणं माळावरुन जाताना पाठीत वाकलेली ती एखाद्या बेवारशी मरतुकड्या मांजरीसारखी दिसत होती. मी मख्खपणें पहात होतो. ती गेल्याची खात्री वरुन घेत होतो माझे डोळे फुटले का नाहीत? माझ्या हातून हे काय घडलं? याचा शेवट काय होईल? मला काही सुचेनासं झालंय; पण राजश्री, आज मीं आई असूनही तिला घालवून करंटा झालोय हे मी कसं विसरु ? कसं सहन करु ? 10 --- लटपटत-खुरडत. भाग पाडलं. लागीर ३५ --- --- -- --- FB 'तेच म्हणतेय मी. असा त्रागा करुन घ्याल; तर प्रकृती खंगून जाईल. एवढं झालं तरी त्यांचा जीव तुमच्यासाठी अडखळला का? एखाद्या आईनं पदर पसरुन विनवलं असतं, 'मला जा म्हणू नकोस' म्हणून; पण लेकीचा ओढा फार! त्यात निमित्त मिळालं. पैसा नि लाडकी लेक तिथं. इथं आता काय आहे? धंद्यात बुडालेला मुलगा नि त्याची नको असलेली वायको पोरं! त्या कशा इथं राहातील? त्या गेल्या म्हणून तुम्ही काहीतरी भाबडे विचार मनात आणून हळवे बनू नका. उगाच हाल-वैताग करुन प्रकृतीवर परिणाम होईल. पैसे घेऊन येतील किंवा त्या पैशावरच तिकडे चैनीत राहतील. तुम्ही का दुःख करता. चला, जेवण करुन घ्या. मला भूक नाही. तुम्ही जेवण करुन घ्या. मी जरा बाहेर जाऊन येतो. सखाराम घराबाहेर पडला. त्याचे दोन-तीन दिवस विचित्र मनःस्थितीत गेले. एकीकडे बायको, आईच्या वागण्याच्यात हा आणि पैशाची दडपशाही सांगायची; तर एकीकडे त्याला आजपर्यंत- च्या आयुष्यातील आईच्या कष्टमय जीवनाचे व प्रेमाचे क्षण आठवायचे. एक जीवघेणा संघर्ष त्याच्या मनात थैमान घालत होता. धंद्यातील अपयश आणि आई-बायकोचा बेबनाव या दैवदुविलासाने त्याचे मन