Jump to content

पान:लागीर.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेलू नि जांभलं -BBP' 'पिंकू इकडं ये बरं तू. त्या लागीर ३४ आणं, ल्यात. जाऊ दे त्याना. त्या सगळंच काहीही आणायला नि निघा- 25 165 आतून राजश्रीचे शद्व फणकारले. पिंकू आत गेला. म्हातारी सखारामा- कडं बघत खांबाला धरुन पायऱ्या उतरली. न राहावून तिनं पुन्हा एकदा सखाकडं पाहिलं. एक उसासा टाकला. वैधव्याचं एक पर्व संपलं होतं. दुसऱ्या पर्वाला सुरुवात करताना ती थकल्या पायात वळ आणून कमरेत वाकून चालत होती. विन शिडाच्या होडीसारखी दिशाही ! कळाहीन!! संकेतहीन! ! ! टेकडीवरच्या लिंबाआड म्हातारी दिसेनाशी झाली. सखा ओसरी- वर आला. टेकडीकडं त्यानं न्याहाळून पाहिलं. क्षणभर त्याच्या डोळ्या- पुढं अंधारलं. जणु त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्याच हरवल्या. मोठ्या आजारातून उठल्यासारखा त्याला स्वतःत निर्जीवपणा जाणवला. समोरच्या भिंतीवर नानांचा हार घातलेला फोटो लटकत होता. नको वाटत असतानाच अंथरुणाला खिळलेल्या नानांचे शब्द त्याला आठवू लागले. ते आईला म्हणाले, 'सावित्री! तू रडू नकोस. आपला ह्यो सखा दहाला भारी हाय. तू त्येच्या जीवावर दुनिया बघशील. ू अन् आज त्यानं तिला दुनिया दाखविली होती. किती वेगळ्या तऱ्हेची! दुःखानं त्याचा चेहरा पांढराफटक पडला. ओंजळीत तोंड लप- वून त्यानं हुंदका दिला. राजश्री केव्हाची चौकटीत येऊन उभी होती, ती चटकन् पुढे झाली. 'अहो, आत चला तुम्ही. जगाला तमाशा नको. मुलांनी व मी किती हाल काढले; पण जग काय म्हणेल, याची भीती होती, म्हणून सारं आतल्या आत सहन केलं - चला पुरुषासारखे पुरुष आणि बायकासारखं रडणं बरं दिसतं का? वरं दिसण्यासाठीच का गं दुनिया सारं काही करते? मी आईला या माझ्या आईनं माझ्या- साठी काय केलं नाही बरं? सारं काही केलं ते माझ्यासाठीचं. मी घराबाहेर काढलं ते बरं दिसण्यासाठी ?