पान:लागीर.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इलागीर ३३ तितक्या लवकर तू इथून निघून जा. उद्या बाबासाहेब येतील, त्यांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यावं लागणार आहे. त्यांच्या मुलीचं, नातवंडांचं दर्शन त्यांना दुःख देणार आहे. ते सारं पाहून-ऐकून संतापतील. अशा वेळी तू इथं नकोस, आई! पिंडीवर बसलेल्या विंचवाची गय करता येत तू नाही. आई असलीस, तरी या गुन्ह्याला क्षमा नाही. मी अगदी चक्र- व्यूहात सापडलोय. बाबासाहेबांनी भांडवल म्हणून मोठी रक्कम मला दिली होती. मी तर साफ बुडालो - -- वाटलं होतं तुझ्याकडं शिल्लक असलेली रक्कम देऊन मी मोकळा होईन. विनधास्त राहिलो; पण रात्री राजश्रीनं सांगितलं, नि ब्रम्हांड आठवलं - तुझ्यामुळं! जा, जा आई आता तुझ्या मायाजाळात मला अडकवू नकोस! पोरा तुला सोडून कुठं जाऊ? कशी जाऊ? तू सांगतोस तरी कसं? तू माझी दुनिया हायेस. तूच जा म्हणतोस. इथच मी मेले आता! इथंन जाईल ते माझं भूतच जाईल. तू माझ्या काळजातच मेख मारलीस माझं आईपन ठरलं - तुझ्या वापाच्या माझं अप आसं - -' म्हातारीला पुढंच बोलवत नव्हतं. पदरानं डोळे पुशीत ती तिथं आशेनं घुटमळली; पण सखारामचं मन विरघळलं नाही. तो दू नजर लावून खांबाला टेकून उभाच होता. एका डागाळल्या मळकट पिशवीत एक जुनेर कोंबून म्हातारी सखारामपुढं आली. आता तरी तो मायेनं कोसळेल, असं तिला वाटलं; पण त्यानं तोंड फिरवलं, तेवढ्यात नातवाने तिच्या पायाला मिठी मारली. आजी! मी येणाल तुझ्याबलोबल.' नको वाळा, मी डाक्तरच्या दवाखान्यात चाल्ले. ' त्यानं मिठी सोडली. म्हातारीनं त्याला जवळ घेतलं कुरवाळलं. मायेनं त्याचं मुकं घेतलं. तिचं मन भरुन अला. आषाढसरीसारखी आसवं ओघळू लागली. आतून हा सारा प्रकार पहात राजश्री उभी होती. बाहेर सखाराम तोंड फिरवून उभा होता. 'तू इथं घरातच थांब, मी येताना खाऊ आणीन तुला.