पान:लागीर.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ३२ 6 ब्वा! गाढव कण्हण्याऐवजी गोणच कुंथायला लागली म्हणायची ! "पोरा डोक्यात राख नगं घालून घेऊस. शांत मनानं इचार कर. इश्वास ठेव माझ्यावर. मी तुझा पैसा देवाच्यानं इमानानं वापरला. पर पुरा पडना, म्हणून माझी वजरटीकबी मोडली. ' क कठी 'मोडली नाही! दिली म्हण --- यमीला ! , " त्वांड संभाळून बोल सख्याड, तुला तुझ्या बापाची शप्पत हाय - मला शपथ घालतेस पण ( आई म्हणायची मला लाज वाटते. ' " का? मी लिवणारी नाय म्हणूनच व्हय? मी लिवणारी आसते तर समदं लिवून तुझ्या म्होरं दिलं आसतं. कायबी काळबेरं झालं नसतं. तूबी दिल्याघरच्या मायभणीवर अदावत घेतली नसतीस. आता तुला माझी लाज वाटतीय, तर त्येला मी काय करु? ' 'यमुनीकडं जा. लई गरजा भागवल्या नव्हं तिनं? मग एवढी गरज भागव म्हणावं! पैसा ठेवून घेतला. आता तीं तुला ठेवून घेते का वघ. यमीकडं जा म्हणतोस? पोरा, तुला जन्म दिला तसा तिलाबी. ती मला संभाळील; पण अंगी डाग घेऊन सोयन्याच्या दारात कशी जाऊ? तेबी लेकीला माझ्यासाठी बोल लावून. --- तू जा. म्हणजे खरे काय ते तरी कळेल मला, ती येऊ दे इथं भांडायला. मग पाहतो सारं. तू मात्र इथं थांबू नकोस. मी धंद्यात बुडालोय. वेड लागायची पाळी आलीय. त्यात तुम्हा माय-लेकीच्या कारस्थानात कुटुंब देऊन फसलो. तू यमुनीकडं जा. ती तुला साठलेला पैसा देईल; निदान तुला थारा तरी देईल. माझ्यातून न निघणारा तुझा जीव तिच्याजवळ कसा राहातोय, ते तरी मला पहाता येईल. 'लेकरा खुळा झालास तू! तुलां कुणी सांगितलं आसं? तुझा इश्वास तरी कसा बसला ? J वास झाली तुझी ती नाटकं ! राजश्री श्रीमंताची लेक आहे. तिच्यासमोर तू ही चोरटी नाटकं केलीस. त्यानंच माझी मान खाली गेलीय आता आणखी तमाशा नको. मला लाजवू नकोस आई! शक्य