लागीर २७ होती. सासरी निघाल्या सारखी रडत होती. सारखे डोळे पुसीत ह मन मात्र श्रावणसरीत नहात होतं फि गाडीनं वळण घेतलं आणि नमाला आठवलं तिनं शाळेच्या मेळयात म्हटलेलं गाणं, . तात्यांचं वळणावरुनी वळली गाडी आज सोडला गाव ॥ तुझ्याच आई अश्रूसंगे पुसीले पहिले नाव ।। नव-नावाचं लेवुनी कुंकू जाते मी माझ्या घरा ।। आशीर्वाद लाभो आई या पोटच्या पाखरा ॥ TIPO 15 पहिल्यांदा मुंडावळया बांधून नांदायला येतानाही हे गाणं तिला आठवलं होतं. पण आज तिला ते अधिक घायाळ करीत होतं. भावनांचे मोती डोळ्यांच्या शिंपल्यात भरीत होतं. अ अनमोल मोती टपाव ओघळत होतं. मोती टपाटप खाली
- 1 1500
mir 5 PP 1ST 150 5 THE FED नमा देवळाच्या कोपऱ्यावर दिसली तेव्हाच तिची आई गडबडीनं आत गेली. भाकरीचा तुकडा व पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. नमावरुन भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला, पाणी ओतलं. तिच्या तोंडावरुन मायेनं हात फिरवून अला-बला घेतली. शेजाराच्या आया- वाया जमल्या होत्या. घटकेत घर मोहरुन आल्यासारखं झालं. तात्यांना अंगावर फुलं पडावीत असंच वाटत होतं. शेजारणी नवऱ्याची ख्याली खुशाली विचारण्यात चेष्टाविनोद करण्यात रंगल्या. तात्या तरंगल्या- सारखेच कधी परड्यात पोहचले, ते त्यांचं त्यांनाच कळलं नाही. रात्रीचं जेवण झालं होतं. नमा अंथरुणावर पडली होती. झोप येत नव्हती. दिनकरचे शब्द तिच्या कानावर आदळल्यासारखे तिला भासत होते. तिच्या साच्या प्रयत्नावर पाणी पडले होते. दिनकरवर त्याचा काही परीणाम झाला नव्हता, तो आपल्या विचाराशी ठाम होता. नमा या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होती. आतल्या खोलीत