लागीर २६ पान देणं घेणं, कर्ज वाढत गेलेलं व्याज. त्यांची झोप उडाली होती. ल • पहाटेपासून नमा आवराआवर करीत होती. तात्या रात्रभर जागे होते. त्यामुळं तिच्या हालचालीची चाहूल त्यांना आपोआपच लागत होती. आठवत होतं, ती पहाटे कधीच उठत नव्हती. तिला ते जमत नव्हतं. तिची आई म्हणायची, 'लेकीच्या जातीला सारं जमायला पाहिजे.' त्यावेळी जे पटलं नाही ते तात्यांना आज पटलं होतं. नमाची आंघोळ झाल्यावर तिनं तात्यांना आंघोळीस पाणी दिलं. त्यानंतर तिच्या सासूचं व दिनकरचं आटोपलं. दिनकर जरा चिडल्या- सारखा बोलत होता. तात्या मनातच म्हणत होते, सकाळच्यापारी एखाद्याला चिडल्यावाणी हुतं. जावायबापू त्यातलंच हैत.' चहा-नाष्टा उरकला निघण्याची तयारी झाली. भरलेली बॅग नमानंच उचलली तेव्हा तात्यांनी ती आपल्या हातात घेतली. स्टँडवर जाताना दिनकर नमाशी बोलत चालला होता. म्हणून तात्या अतंर राखून चालले होते. गाडी लागली. खिडकीजवळ नमा वसली. शेजारी तात्या बसले. जावईबापूंचा निरोप घेताना त्यांनी विचारलं, चार दिसांनी माघारी धाडलं तर त्यावर दिनकर हसला. म्हणाला, चाललं न्हवं?' " ते सारं ती सांगेल. तिला कल्पना दिलीय मी.' त्यानं नमाकडं पाहिलं तेव्हा ती आणखीच रडू लागल खुशीत होते. दिनकरला हात हलवून तीन-तीनदा ‘वराय येऊ चा-सा दिसानं परत. ' असं म्हणत होतं. 3 PIS लागली. तात्या गाडी सुरु झाली, तेव्हा नमानं डोळ्यांचा पदर काढला. ती पुढे-मागे झुकून बाहेर पाहू लागली; पण दिनकर कुठेच दिसला नाही. तात्या तिची अस्वस्थता पहात होते. तिचे डोळे पुन्हा आसवांच्या पागोळचा गाळू लागले. परमेश्वराच्या अगाध लिलेचं तात्यांना कौतुक वाटत होतं. लग्न बंधनानं एकत्र येणारे जीव एकमेकासाठी किती जीव टाकतात ते पाहून अचंबा वाटत होता. त्यांची लेक माहेरी येताना
पान:लागीर.pdf/३३
Appearance