पान:लागीर.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर २५ पुन्हा वाढ असं नमाला बजावलं. रात्री अगदी जेवण वेळेलाच दिनकर घरी आला. तात्या त्याची पाच वाजल्यापासून वाट पहात होते. त्यांनी तसं जावयाला पहाताच हसत हसत बोलूनही दाखवलं. मात्र त्यानं न ऐकल्यासारखं करुन, आई दुपारी जेवली का? हे नमाला विचारून घेतलं. जेवताना सासऱ्याच्या बोलण्यामध्ये तो फक्त अधूनमधून हुंकार भरत होता. त्याला त्यांच्या बोलण्यात रस वाटतच नव्हता. जेवण झाल्यानंतर बाहेरच्या खोलीत पान खातानाही दिनकरचं तात्यांच्या बोलण्याकडं लक्ष नव्हतं. आतल्या खोलीकडं त्यानं कान टव- कारलेलं होतं. सासू-सुना जेवायला बसल्या होत्या. हळू हळू चाललेली धूसफुस त्याच्या कानांनी टिपली होती. तो आत गेला तेव्हा त्याची आई आपल्या ताटात सुनेच्या माहेरचं काही घ्यायला तयार नव्हती. नमाने बळेबळेच ताटात वाढलेला रव्याचा लाडू तिनं सुनेकडं भिरका- वला. तिच्या खांद्याच्या हाडावर तो फुटला. दिनकरने हुकुमी, पण हळू आवाजात नमाला बजावले, ( येण म्हणजे तिला हवं तेच वाढ. जादा शहाणपणा करु नकोस.' नमाला रात्रीच्या जेवणाला ओकारी येत नव्हती, म्हणून तो जरा थंडच होता; पण त्याचमुळं त्याला सकाळी जेवणावेळी ओकारी ढोंग वाटत होतं. आईचं म्हणणं त्यालाही पूर्ण पटलं होतं. तो बाहेर आल्यानंतर तोंडापुढे मासिक धरुन त्यातील चित्रे व मथळे न्याहाळीत राहिला. त्याला सासऱ्याशी बोलणें नको होते. मासिक चाळता चाळता तो कॉटवर ऐसपैस पसरला. कॉटवर बसलेले तात्या सरकून अगदी कोपऱ्यावर बसले. थोड्याच वेळात त्यांना जावयाचं घोरणं ऐकू येऊ लागलं. त्यांच्या बिछान्याची सोय होईपर्यंत त्यांना तिथंच बसावं लागणार होतं. 700 नमानं कॉटच्या शेजारी बिछाना घातला. त्यावर ते झोपले. तिने दिनकरच्या अंगावर अलगद शाल पांघरली. त्यावरुन गरम रंग घातला, तात्यांना तो घेताना कराव्या लागलेल्या पैशाच्या गोळाबेरजेची आठवण झाली, आणि मग सारं नमाचं लग्नच आठवत राहिलं. हुंडा कपडे मान-