पान:लागीर.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर २४ अवघडून उभ्या राहिलेल्या नमाच्या हातातील कपवशी नाकडोळे मुरडीत सासूबाईंनी घेतली. चहापानंतर काही बोलणं निघेल असं तात्यांना वाटलं; पण नमाच्या सासूबाई ढिम्म वसून होत्या. त्यांना फारंच अवघडल्यासारखं वाटलं पण परक्या गावात परक्या माणसात ते पराधीनासारखं फक्त वसून राहाण्याशिवाय काय करणार? आत नमानं तात्यांची पिशवी उघडली होती. डब्यात रव्याचे लाडू होते, पुडाच्या वड्या होत्या, लोणचं-कुरड्या, आणखी काहीवाही थोडं थोडं बांधून दिलेलं पाहून तिला आतल्या आत कढ येत होते. आईची माया! रात्री जागली असेल. पहाटे खोकत खोकत उठली असेल. अधू डोळ्यांनी पहात चाचपडत एक-एक उरकलं असेल. तेही हुरुपानं कौतुकानं ! तिच्या डोळ्यापुढ आई दिसू लागली. आसवांचे दाट पडदे पापण्यांवर सरकू लागले. पण मनाला आवर घालायला आता ती शिकू लागली होती. तात्या तिला न्यायला आले होते. उद्या तर ती जाणार! पहिल्या संक्रांतीच्या सणाला. तिळगुळ वाटायला. गोड गोड बोलायला, गोड काही सांगायला. उद्याच तर जायचं पण आईनं लाडू-वड्या कितीतरी दिल्या होत्या. लाडकी लेक माहेराला येणार असली; तरी लाडका जावई इथं थांबणार म्हणून त्याचंही कौतुकच. ही माणसं लेकीसाठी जावयावर सहजच प्रेम करतात. तसं सासरच्या माणसांनी लेकासाठी सुनेवर - - छे! कसलं प्रेम? लग्नातील देण्याघेण्यावरुन, मान-पानावरुन अजूनही कुरबुर. कधी कधी मारहाणही चालते. आईला तात्यांना हे काही माहिती नाही. त्यांना वाटतंय लेक सुखी आहे. आपण करायचं ते खूप • केलंय. होय; पण ते त्यांच्या समाधानाला पुरेस नव्हतं. लेक दुःखी आहे, हे त्यांना नकोच कळायला. अधू डोळ्यांना आणखी आसवांचं श्रम, श्रमानंच थकली. आता तरी नको. विचाराबरोबर तिनं आपला ओठ दाताखाली दाबला. आलेली कळ दुःख समजून तिनं सोसली. दिनकर बाहेरुन आल्यावर तात्यांशी त्याची पाऊस पाण्यावरुन निमित्तमात्र चर्चा झाली. ऑफीसला जाताना त्यानं आईला जेवायला