पान:लागीर.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर २२ 'हं, ही घे! ' म्हणून त्यानं तिच्या खाड्कन मुस्काटात मारली. तिचा कान पिरगाळीत तो म्हणाला, ( 'कोण अडाणी? मी? की माझी आई? तिच्या कानाला कळा लागल्या होत्या. सासूवाई गालावर मूठ देऊन पाटावर बसून होत्या. आपल्या गुस्स्यातच त्या म्हणाल्या, ' दिना, मला उद्या सक्काळच्या गाडीला वसवून पाठीव माघारी. माझं मला नवऱ्याचं

हाय. तुझ्या दारात मी

आल्ले पडून हायाला नाय. A 'अन् हे घर काय हिच्या बापाचं आहे? नालायक साली. त्याच्या हातातला आपला कान नमानं कळवळून सोडवून घेतला. ती तोंड ओंजळीत लपवून खाली बसली, तेव्हा तिच्या पाठीतही दोन रट्टे वसले. ती आवाज कोंडून डोळे पुसत राहिली. तो चपला सरकावून दारातून बाहेर पडला होता. अजुनही नमा दुःखाचे उसासे सोडत बसून होती. तिची उदास नजर अधून-मधून आसवांनी चिव होत होती. एखादा चुकार थेंब गाला- खांली ओघळत येता येता सुकून जात होता. दुसऱ्या खोलीत तिची सासू भाजक्या शेंगा खात निवांत बसली होती. एका घरात रहात असूनही धर्मशाळेतल्या प्रवासिनीसारख्या होत्या. खोली रुक्षपणानं भरून राहिली होती. दोन वृक्षांच्या फाद्या एकमेकीत मिसळतात. वाऱ्याच्या झोताबरोबर एकमेकींना घासत रहा- तात. तिथं प्रेम नसतं, रक्ताचं नसानसात खेळणारं-वसणारं नातं नसतं; असतो फक्त ठायी ठायी संघर्ष. वणव्याची अपेक्षा करणारा! त्या वावरत दारावर टक्टक् झाली. भिंतीला डोकं टेकून विचार तंद्रीत ध्यानस्थ झालेली नमा चटकन् उभी राहिली. पवार इथंच रहातात ना? "हं होय. कोण आहे?" तिन दार उघडलं. " तात्या ऽ! ' ती अत्यानंदानं म्हणाली आणि त्यांच्या हातातील जड पिशवी तिनं आपल्या हातात घेतली.