पान:लागीर.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

TFTP TP TOPS 17 to the plip Pag har smuk THOR TIP वळणावरुनी बाहेरच्या खोलीत दिनकर सुपारी चघळत, पेपर चाळत होता. नुकतंच त्याचं जेवण झालं होतं. आतल्या खोलीत त्याची आई व बाय- को जेवायला बसल्या होत्या. दिनकरच लक्ष पेपरकडं नव्हतचं. अलिकडं रोजच घडणाऱ्या गोष्टीमुळं तो आतल्या आत धुमसत होता. तेवढ्यात त्याला बायकोच्या ओकारीचा आवाज आला. वसल्या जागेवरुन त्याला मोरी दिसत होती. वाकून ओकारी देणाऱ्या बायकोचा त्याला संताप आला होता. तोंड धुऊन ती उभी राहिली, तरी दिनकर तिच्याकडं पहातच होता. तिचं नाक-डोळं लाल झालं होतं. गेला आठवडाभर हे असंच चाललंय. जेवायला बसलं की चार घास पोटात जातातन् जातात तोच ओकारी यायची. जेवण अर्ध्यावरच रहायचं. तिच्यामुळं सासूबाईही जेवणाचं ताट बाजूला सारायच्या आणि आईसाठी दिनकरच्या अंगाचा तिळपापड व्हायचा. आईला त्यानं कितीदा सांगून पाहिलं की, 'तू माझ्याबरोबरच जेवण करत जा. ' पण ती ऐकायची नाही. म्हणायची 'नमा येकली मागं हायली तर मला शेजारी-पाजारी काय , ( , म्हंत्याल? खरं तर शेजाऱ्यांना असल्या गोष्टी कोण सांगणार? पण तिचा मात्र असा रोख असायचा की नमा अशा खाजगी गोष्टी बाहेर सांगते, नमाला इकडं आड नि तिकडं विहीर अशी स्थिती प्राप्त झालेली. दिवस गेल्याचं कौतुक बाजूला राहून डोहाळ्याच्या त्रासाला ढोंगाचा आरोप लावला होता. नमाला वाईट वाटायचं याचं की, दिनकरलाही त्याच्या