पान:लागीर.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर १७ डोळ्यावर ? अरे, ते सारे खोटे होते रे. खर्रच खोटे होते. आज पर्यंत योगच आला नाही. मला तुला सारे सांगायचे होते की, ते सारे होते-खोटे होते म्हणून. र झूट 'नाही श्री. मी तुझ्या तत्वज्ञानाला फसणार नाही. सर्वांपेक्षा जास्त मी तुला ओळखतो. त्या प्रसंगीसुद्धा मी तुझ्या अधिक सहवासात होतो आणि कोणालाच माहिती नसलेल्या गोष्टी तुझ्या संदर्भात मी स्वतः अनुभवल्यात अगदी नामजोशींना सुद्धा माहिती नसलेल्या. 3 मी एका एका शब्दावर दाब देऊन अगदी आत्मविश्वासाने बोललो पण श्रीवर त्याचा परिणाम दिसला नाही. ( तो मलाच उलट समजून देण्याच्या आविर्भावात सांगू लागला. ऐकून तर घे. त्यावेळी मी फार पेचात सापडलो होतो. आई व माधवी यांच्यात कसा समझोता करावा. हेच मला कळत नव्हते. मी तुला याबाबतीत विचारलंही होतं तू दम धरण्याचा उपदेश केलास. प्रेमविवाहाच्या माणसास असला धीर कुठे सापडायचा? विचाराच्या ताणाने मी भ्रमिष्ट होईन, अशी भीती मला वाटू लागली. तो सारा प्रकारच माझ्या सहनशीलतेच्या बाहेर होता. आईचं मन लाथाडून मी माधवीकडे जाऊ शकत नव्हतो. आणि माधवीस विसरुन मी आईजवळ सुखी राहू शकत नव्हतो. चोहोबाजूंनी माझा कोंडमाराच झाला होता . थांव ! श्री, तू हे तुझ्या त्यावेळच्या मनःस्थितीचं सांगतोस. गुदर- लेल्या प्रसंगाचे भान तुला झपाटलेल्या अवस्थेत कुठं होतं? तुझ्या त्या स्थितीला सारा गाव साक्षी आ नामजोशींना मानतोस का? महाराजा.' [2] ह आणि काही THIS --- हो तर. अगदी जरुर; पण माझे पुरे ऐकून घे. मग विचार तुझ्या शंका. हं. तर काय, तुझ्याबरोबर फिरायला गेल्याने आणि हडळी - च्या झऱ्याविषयीच्या अडाणी समजूती ऐकून, मला एक कल्पना सुचली. अंगचा अभिनय असा वापरात आणण्यासाठी मी झपाटल्याचे ढोंग केले , श्री? ि होय बाबू. बालपणापासून कधीच नव्हे इतका वेताने मार