Jump to content

पान:लागीर.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गेला. माझ्याकडे दिलेले रुद्राक्ष वगैरे तसेच राहिले. श्री तिकडून परत येण्या अगोदरच मी पुण्याला कोर्ससाठी गेलो. त्यानंतर आलो तेव्हा श्री नागपूरला नोकरीनिमित्त सपत्नीक गेल्याचे समजले. त्या प्रसंगातील वस्तूरुप आठवणी मात्र अजूनही माझ्या संग्रही होत्या. ती पांढरी लांबट वस्तू आणि रुद्राक्ष. त्यानंतर आज कितीतरी दिवसांनी श्री मला भेटतोय. तो दोन मुलांचा बाप झालाय. मी ही संसारी गृहस्थ झालोय; पण काळाच्या ओघातही त्या भयानक स्मृती दडपू शकल्या नव्हत्या. मी अगदी आत्ताच अनुभवल्याप्रमाणे सांगू शकतोय. ती भीती मनाचा कब्जा घेतेय. त्या पाठोपाठ आवाज. मी दरवाजाची कडी दार उघडतो. लागीर १६ वाजत. अगदी कडी लावूनच बसलायस. झोपला होतास की काय ? नाही रे. उगाच बसलो होतो. तुला वाट पाहावी लागली ना? ( ( मुन्ना हट्ट करीत होता, म्हणून मलाही थोडा सरसरुन काटा आला. , डाउशीरच झा 'तसं काही नाही; पण प्रसन्नच वाटत नाही बघ. खरे आहे. वायको माहेरी गेली की असंच होतं. कोणाला बोलू- नही दाखवता येत नाही. कसे?' असे म्हणत तो डोळे मिचकावून हसला. 'तुला माझ्यापेक्षा अधिक अनुभव आहे ना!' 'होय तर! माझ्यासारखा अनुभव फार विरळा. अमानुष अनु- भव. त्या नवेपणात तुम्ही लोकांनी किती हाल केले रे माझे. आठवलं की वाटतं शत्रूवरही तसा प्रसंग येऊ नये. ' 'अरे, तूच तर स्वतःवर तो प्रसंग ओढवून घेतलास. त्यात लोकांचा काय दोष? तू त्या हडळीच्या डोहावर पाणी प्यायला गेला नसतास तर झाला. तो खो खो हसत सुटला. त्यावेळसारखाच नि माझ्या अंगावर " आज अमावस्या आहे श्री ! ' मी दरडावून बोललो. बाबूs तू अजून विश्वास ठेवतोस? त्यावेळचेच धुके अजून आहे