Jump to content

पान:लागीर.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर १५ लांचा आवाज झाला, तरी तसाच पडून राहिलो. काळजाचे पाणी झाले होते. बहुतेक श्रीच असावा; पण माझ्यात कोणतेच धैर्य नव्हते. स्वतः- च्या जीवापेक्षा मला काहीच प्रिय नव्हते. मित्रप्रेम, धैर्य, निष्ठा सा व्यर्थ ठरले होते. माझी जबाबदारी मला आत्मघातकी व मृत्यूशी झुंज घेणारी वाटली. मी नामजोशींनी दिलेल्या वस्तूंचा व मंत्राचा माझ्या संरक्षणार्थ वापर केला. त्या क्षणी मला ती बेइमानी वाटली नाही. फक्त अगतिकता वाटली. त्यानंतरची रात्र मी काळजाने कशी राम धडधडत्या काठ (6 काढली ते मलाच माहित. 'चिमण्यांचा किलबिलाट ऐकून उठलो. श्री अजून झोपला होता. " मला बेडशीटवर रक्त दिसलं. घावरुन मी इकडे तिकडे पाहिले. श्रीच्या पायाला जखम झाली होती. रक्तस्राव सुकून गेला होता. बाटलीची काच त्याला लागली होती. मी त्याला जागे करुन विचारले, तर तो म्हणाला, रात्री थोडा उठलो होतो, तेव्हा काच लागली. रात्रीच्या वादळा- ने बाटली पडून फुटलेली दिसलीच नाही. 7 STR ते ऐकून मी मनात त्याचे आभार मानले. ले. आला नव्हता. काळजीच्या सुरात मी म्हटले, अरे, पण काच लागली तर मला 9 त्याला माझा संशय केले नाहीस? पट्टी केली असती. ' माझा साळसूदपणा: ‘छे रे, एवढी जखमच नाही. थोडेसे टोचल्यासारखे झाले. मात्र रक्त जरा जादाच गेल्याचे दिसतेय. मला नव्हती कल्पना. श्री बाह्यांगी सुखरुप होता याचे मला समाधान वाटत होते. आज नामजोशी येणार. जीवावरचं मोठं ओझं खाली होणार. या खूषीत मी होतो. झालेही तसेच. नामजोशी आले. त्यांनी माझे आभार मानले. काकू म्हणाल्या, नवाबू होता म्हणून सारे निभावले. आम्हा सासू-सुनांना आधार 1 7611 , वाटला त्याचा. मनातून मी खजील झालो, लज्जीत झालो; पण उघड काही दाखविले नाही. त्याच दिवशी श्री नामजोशींबुवांबरोबर औदुंबरास