पान:लागीर.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो कॉलेजचे जुने मॅगेझिन वाचत वसला. माझ्या मनात नामजोशीं चे विचार येत होते. त्यांच्या ज्ञानाबद्दल माझा आदर वाढला होता. मी झोपतो आता. मोठा लाईट बंद करतो. तूही झोप 'बाबू, म आता." लागीर १४ मोठा लाईट बंद करुन श्री झोपला. तो त्या दिवशी माझ्याशी बोलू लागला होता; तरीही त्याच्याशी अधिक बोलण्याचे धाडस मी केले नाही. न जाणो लागीराचे वारे आले नि तो माझ्यावर च धावला तर? मामला निर्विघ्नपणे फक्त तेवढी रात्र, एकच रात्र काढायची होती. दिवसभर आळसावलो होतो. लवकरच मी झोपेच्या आधीन गेलो. मात्र श्रीच्या संभाव्य धोक्याचा बंदोबस्त मी केला होता. असुप्त मनात दडलेल्या भीतीमुळे असेल, पण त्या रात्रीही मी अचानक जागा झालो. श्री कॉटवर नव्हता! बाहेर पाऊस कोसळत होता. घड्याळात एक वाजून गेला होता. कालचा प्रसंग ध्यानी धरुन मी आतूनच बाहेरचा कानोसा घेतला. कोणीतरी कुजबुजत होते. न कळत माझा हात खिशात गेला. नामजोशींनी दिलेले रुद्राक्ष, लिंबू, अंगारा मला धीर देत होता; तरीही विलक्षण भीतीने माझा ताबा घेतला. मला बाहेर जाण्याचे धैर्य झाले नाही. बंद खिडकीच्या तावदा- नातून पहावे, अशा विचाराने खिडकीच्या कठड्यावर चढून जे पाहिले त्यामुळे माझ्या शरीराला कंप सुटला. फारच भयावह दृश्य! दोन पाया- वर उभ्या असलेल्या अस्वलासारख्या प्राण्याजवळ रुंद खांद्याचा श्री उभा होता. पण कुजबुज ? भुतांची भाषा मला तरी काय समजणार? मी काचेच्या तावदानाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला पण काहीच बोध होईना. मी पुन्हा बाहेर पाहिले बापरे! प्राण्यास चक्क गोंजारीत होता. --- अस्वली श्री त्या अस्वल भीतीने गर्भगळीत झालेला मी, लटपटत्या शरीराने कॉटकडे धावलो. माझ्या धक्क्याने खिडकीतील तेलाची बाटली पडून फुटली.. आवाज झाला. देहभानाशिवाय सारेच विसरलेला मी, स्वतःच्या बचावा- साठी ब्लॅकेट गुरफटून पडलो. तोंडाने आठवत असलेला मंत्र म्हणत होतो. रामनाम म्हणत होतो. मुठीत रुद्राक्ष आवळून धरले होते. पाव-