पान:लागीर.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर १३ सरशी अंगावर काटा आला आणि मला दरदरून घाम फुटला. लागीर झाडाला (झपाटलेल्या व्यक्तीस) भेटून जाते म्हणतात. मघाचा पावलां- चा आवाज कोणाचा असेल? ही वस्तू म्हणजे त्या हडळीचे नख किंवा दात तर नसेल? त्या विचारासरशी मी धाडकन् दार लावून घेतले. कॉटवर येऊन झोपलो तेव्हा श्री कॉटवर पडून होता. त्याने डोळे मिटले असले तरी त्याचा श्वास एका लयीत नव्हता. तो जागाच होता. त्याला काही विचारणें, म्हणजे संकंटाला आमंत्रण देण्यासारखेच; म्हणून मी गप्पच राहिलो. त्यावेळी तो सरळपणे खोलीत आला, हेच नशीब असे मला वाटले. त्या रात्रीची घटना मी कोणास सांगितली नाही, तसेच श्रीला शद्वानेही हटकले नाही. मला दुहेरी भीती होती. श्री बिथरु नये, असे मला मनोमन वाटत होते. रात्रीची घटना इतरांना सांगितली तर सारेच घावरुन जातील. एका रात्रीसाठी आपली असमर्थता उघडी पाडणे माझ्या मनाला पटत नव्हते. आता फक्त एक रात्र श्री सोबत काढली की, मी मोकळा होणार होतो. काकू, वहिनी व नामजोशी यांच्या मर्जीला पात्र ठरणार होतो. आपण मित्रासाठी एका दिव्यातून जात आहोत ही भावना मनाला समाधान देत होती. एकीकडे रात्रीचा तो प्रसंग आठवत होता; पण आता मी सावधपणें त्यावर विचार केला होता. नामजोशींनी सांगितलेले उपाय माझेजवळ होते. रात्री घाबरुन गेल्याने मला काही सुचले नव्हते. आता मात्र तसे घडणार नव्हते. मी मनात फार धैर्य आणले होते आणि पुन्हा तसे काही घडेलच असेही नव्हते. मात्र त्यादिवशी श्री लागीर झाल्यानंतर प्रथमच माझ्याशी परीक्षेबद्दल बोलला, कारण त्याच्या परीक्षेचा निकाल चार-दोन दिवसात लागणार होता. त्याच्याबोलण्यावरुन तो फारच चांगला झाला होता. आदल्या रात्रीचा प्रसंग फारसा गंभीर नसावा; पण आपल्या काल्पनिक भीतीमुळे तसा भासला असावा असेही मला वाटले. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी खोली आतून बंद केली. वादळवारे सुटले होते व वळवाचा पाऊस पडत होता. हवेत गारठा पडला होता. श्री थोडा वेळ गप्प होता. नंतर तो मला म्हणाला, ( मला झोप येत नाही. काहीतरी वाचतो.