पान:लागीर.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर १२ मी गुदमरतोय असे मला वाटायचे. श्री अनावर झालाच तर त्या खोली- स वाहेरुन कुलुप लावून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवायचे, असे नाम- जोशींनी मला सांगितले होते; पण तो सुन्न बसे. मी त्याला कारणा- विना कुलुपबंद करु शकत नव्हतो. एक एक दिवस मी मोजत होतो. दिवसापेक्षा रात्री मी अधिक धास्तावत असे. त्यामुळे मी सावध झोपत असे. श्री जरी माझ्याशी बोलत नव्हता, तरी तो पूर्वीसारखा उग्र-भया- वह दिसत नव्हता. तो विचारमग्न, शांत वाटे. कधी उदास वाटे. खरे तर ते माझ्याच मनाचे भास असावेत. रात्री अनेकदा मी दचकून उठत असे व श्रीला जवळ झोपलेला पाहून मला हायसे वाटे. श्री आतासा त्या महापीडेतून सुटतोय; पण जर का आपल्या गवाळेपणामुळे काही विपरीत घडले, तर त्यास सर्वस्वी आपण जवाबदार ठरु. काकूंचा व त्या नव्या वहिनींचा दोष माझ्यावर राहिल; म्हणून मी दक्ष होतो. रात्रभर एका भीतीच्या सावटाखाली मी जागाच असे. पहाटे चिमण्या चिवचिवू लागल्या की, मला हायसे वाटे. मग शांत झोप लागे. चारपाच रात्री अशाच गेल्या. काहीही घडले नाही. माझ्या मनातील भीती कमी झाली होती. निवांतपणे मी झोपू शकेन, असा विश्वास माझ्यात आला आणि मी झोपी गेलो. कसे काय कोण जाणे; पण रात्री जागा झालो, तर श्री माझ्या जवळ नव्हता. माझ्या काळजात धस्स झाले. लटपटतच मी कॉट वरुन उठलो. बॅटरी घेऊन दाराकडे गेलो. टॉर्चच्या प्रकाशाबरोबर पाव- लांचा आवाज झाला. मला कोणीतरी पळाल्यासारखे जाणवले. मी दाराबाहेर आलो. श्री खांबाला टेकून उभा होता. श्री बाहेर का उभा ? आत चल ना. कळसूत्री बाहुलीसारखा तो खोलीत शिरला. मी बॅटरीने सभोवती पाहिले. सर्वत्र भयाण व शांत काळोख दाटून होता. सारे स्तब्ध व मूक होते. मला काहीच शंकास्पद दिसले नाही. मी खोलीकडे वळलो तेव्हा पायाला काहीतरी टोचलं. प्रकाशात पाहिलं तर एक अडीच इंच लांबी- ची, करंगळीसारखी जाड, पांढरी चपटी पट्टी होती. तशी वस्तू मी तत्पूर्वी पाहिली एका बाजूला गोलाकार दुसऱ्या बाजूस तीक्ष्ण अशी ती वस्तू मी चटकन् उचलून खिशात घातली. मनातल्या विचारा