पान:लागीर.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ११ सुनवाईमुळे घरात काही पहावे लागत नव्हते. रात्रीची जाग्रणे बंद झाली होती. एका भयानक स्वप्नातून जाग येत असल्याप्रमाणे त्या सुखावल्या होत्या; पण भीतीतून संकटातून त्या मुक्त झाल्या नव्हत्या. श्रीची प्रकृती आता बरी होती. तो थोडेफार अन्न घेत होता. पण लागीराने त्याच्या शरीराचा ताबा सोडला नव्हता, नामजोशी शिवाय तो कुणाशी बोलत नव्हताच. त्याचे डोळे पूर्वीसारखे लालसर दिसत होते. विशेष म्हणजे झपाटल्यापासून एकदाही श्रीने माझ्याकडे ओळखी- च्या नजरेने पाहिले नव्हते. स्वतःचे अस्तित्व तो विसरुन बसला होता. नामजोशींच्या उपचाराने तो बराच सावरला होता. विचारी श्रीची बायको, नव्या नवतीच्या नव्हाळीत तिच्या नशिबी है काय अ आले होते? तिचे एक नामी यंत्र झाले होते. C एके दिवशी श्रीकडे गेलो असता, नामजोशी मला म्हणाले, 'श्री चे तुम्ही जिवलग मित्र ना? 'हो' मला 'जिवलग' शद्व वेडावण दाखवत होता; पण मी उघड आत्मविश्वासने बोलत होतो. नामजोशी माझ्यावर खूष झालेले दिसले. त्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकली. ते आठ दिवस अत्यंत जरुरीच्या कामासाठी गावी जाणार होते आणि ते येईपर्यंत श्रीची संपूर्ण देखभाल मी करायची होती. त्यांच्या अनुपस्थितीत काही गडबड होण्याची शक्यता होती, म्हणून सर्व काही बंदोबस्त त्यांनी आधीच मला सांगून ठेवला होता. काही सूचना व विशेष प्रसंगी करावयाचे उपाय त्यांनी मला नीट समजावून सांगितले होते. मी मनातून पूर्ण ढासळलो होतो; परंतु तसे त्यांना जाणवू देणें, हा माझा कमीपणा होता. धाडसी तरुण आणि जिवलग मित्र म्हणून मी माझी प्रतिमा लखलखीत करु पहात होतो. मला माघार घेणे शक्यच नव्हते. नामजोशींनी सांगितलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी स्वतःवर घेऊन त्यांना उसन्या धैर्याने निरोप दिला आणि माझे उसने धैर्य कसोटीला लागले. • रात्री वांडयात एका बाजूच्या खोलीत श्री व मी झोपत होतो. दिवसाही आम्ही तेथेच असायचो. तो तिथे मी, असा नियम ठरलेला होता. मला एक प्रकारे तो तुरुंग वाटत होता. एका अनामिक भयाखाली