Jump to content

पान:लागीर.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर १० नमत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी श्रीचे सासरे बरोबरच्या मांत्रिकास घेऊन परत गेले आणि श्रीचे मामा भेटीस आले. त्यावेळी मात्र काकूचा दुःखाचा बांध फुटला. मामा आजपर्यंत ज्या गोष्टी ऐकून 'वेडगळ' समजत होते; त्या अघोरी भयानक गोष्टी ते डोळयांनी पहात होते. ते धास्तावले बेचैन झाले. पण त्यांना कोणताच मार्ग सुचविता येईना. त्यांच्या ज़बाबदारीच्या नोकरीमुळे त्यांना लवकरच परत जावे लागले. जाताना त्यांनी काकूंना श्रीच्या वायकोला मदती-सोवतीसाठी घरी आणण्याचे सुचविले. काकू मौन राहिल्या. मौनातील होकार समजून त्यांनी तसा निरोप श्रीच्या सासरवाडीस कळवला. श्रीवर देवऋषाचे अघोरी उपचार चालू होते. तोच रानटी मार- हाणीचा उपचार ! उतारा, देणी, अंगारे- धुपारे, उडीद - लिंबे, मंत्र-तंत्र आणि वेताचा मार. श्रीचे अन्नपाणी तुटले होते. तो खूप अशक्त झाला होता, त्याच्या चेहऱ्यावर प्रेतकळा पसरली होती. अंगावर बेताच्या माराचे निळे काळे व्रण उमटले होते. काही ठिकाणी जखमा होऊन त्या चिघळल्या होत्या. बाह्य जगाशी त्याचा संबंध तुटला होता. तो कोणाशी बोलत नव्हता. अंगात लागीराचे वारे आले की तो धावत सुटे. कोणा- लाच आवरेनासा होई चार-पाच माणसे त्याला पकडून खांवाला बांधत. तो भेसूर हसे किंवा रडे. अगम्य हातवारे करी तर कधी अमानुष किंकाळ्या फोडीं. जणु त्याचे माणूसपण संपले होते. एवढ्या धीराच्या काकू पण त्या खचल्या. त्याचा पोलादी स्वभाव अखेर नमला. त्यांचे एककल्ली व्यक्तिमत्व निमाले मामांतर्फे व्याह्याला तातडीचा निरोप गेला. मुलीला आणि एका सुज्ञ जाणकारास सोबत घेऊन व्याही लगेच आले. देवऋषाचे उपचार बंद झाले आणि त्या नवीन आलेल्या माणसा चे उपचार सुरु झाले. त्या माणसाचे नाव श्रीधर नामजोशी. ते मित- भाषी होते. स्वभावाने अतिशय शांत होते. मंत्रजप करुन ते श्रीशी एखाद-दुसरा शब्द बोलत. त्यामुळे एक गूढ, पण विश्वासजन्य शांतता वाड्यात निर्माण झाली होती. श्रीचे उन्मादात धावणे बंद झाले होते. किंकाळचा बंद झाल्या होत्या. काकू जरा निर्धास्त झाल्या होत्या. नव्या