पान:लागीर.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर त्याच्याबरोबर थोडे नाराजीनेच मी घरी बोललो नाही. तोही गप्पच होता. परतला. त्यादिवसानंतर चार-सहा दिवस तो माझ्याबरोबर फिरायला आला नाही. तुटक बोलून त्याने मला वाटेला लावले. याची चीड माझ्या मनात घर करु लागली; मग मीही त्याच्याकडे फिरकलो नाही. 2 एका रात्री गाढ झोपेतून आईने मला हाका मारुन उठविले. डोळ्यावरची झोपेची धुंदी उतरत रत नव्हती व आई मला गदगदा हलवून भयसूचक स्वरांत सांगत होती, अरे, बाबू ऊठ. कसली काळझोप लागलीय तुला? जागा हो. काकूंच्या घरात केवढा गोंधळ चाललाय. श्री कसासाच करतोय ते ऐकताच धावतच मी काकूंच्या वा वाड्यात पोहोचलो आणि समोरचं दृश्य पाहून सुन्न झालो. राज रस्त्याने Fr काही तांबारलेल्या डोळ्यांचा, केस विस्कटलेला, खांवाला बांधलेला श्री घुमत होता. झऱ्यावरच्या हडळीनं त्याला झपाटलं होतं. त्याच्यापुढे देवऋषी अंगारे-धुपारे करीत होता, मंत्र पुटपुटत होता. काही बाही विचारुन श्रीला वेताच्या काठीने मारीत होता 'झाडं'. बोलतं करण्यासाठी त्याचा आटापिटा चालला होता. ते दृश्य फार भयावह होतं. अखेर चेष्टा अंगावर आली होती. श्रीनं जणु विषाची परीक्षा घेतली. मी नको म्हणत असताना झऱ्यावर गेला नि मी मनाशी ठरवलं झऱ्यावर जाण्याचा प्रसंग कोणाला सांगायचा नाही. या प्रसंगाशी मीच मला अपराधी वाटू लागलो. त्यानं हडळीच्या लोकभ्रमाची टर उडविली व त्याचे भयंकर प्रायः श्चित तो भोगत होता. श्रीला लागीर झाल्याची बातमी चोहोकडे पसरली आणि त्याच्या सासऱ्याच्या कानावरही वृतांत गेला. प्रसंग मोठा बाका होता. त्यांनी श्रीला पहायला येताना बरोबर एका माणसास आणले. भुताखेताचे लागीर तो घालवीत होता. विशेष म्हणजे तो मारहाण करणारा मांत्रिक नव्हता. तेवढ्या एकाच गोष्टीबद्दल काकूंना कितीतरी समाधान वाटले होते. त्यांनी व्याह्याशी बोलणे केले नाही; पण विरोधही दाखविला नाही; त्या प्रसंगाने अगतिक झाल्या होत्या; तरी शद्वाने अगर कृतीने