पान:लागीर.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ७ विघ्नापासून मी तिकडे फिरकलोच नाही. एक दिवस काकूंनी मला हाक मारुन विचारले, 'बाबू का रे आतासा येत नाहीस? आमच्या श्रीला करमत नाही. फिरायला नेत जा त्याला. माझे मन तर श्रीकडे ओढ घेत होते. काकूंची जरब अशी की, त्या धाकाने मी तिकडे फिरकलोच नव्हतो. आता आज्ञा झाली होती. त्या दिवसापासून मी श्रीला कधी मळयात तर कधी नदीकाठावर वरोवर नेत होतो. श्रीकांत अबोल झाला होता. 'त्या' अप्रिय प्रसंगाचे ओझे मनावर असल्याने काय बोलावे, कोणता मिषय काढावा हेच सुचत नसे. वराचसा वेळ काहीही न बोलता जाई; पण ण आमचे फिरणे नियमितपणे सुरु झाले. दिवस वैशाखातील होते. ऊन रणरणत होते. आम्ही दोघे आंब्या- च्या दाट सावलीत बसलो होतो. त्याच दिवशी त्याची गप्पात लहर लागली होती. कैया खाता खाता तो कॉलेजातील गमती सांगत होता. प्रोफेसरांच्या सवयी, निवडणुका, कॉलेजातील खटयाळ विद्यार्थ्यांचे उद्योग वगैरे विषयावर तो बोलत होता. नंतर गॅदरिंगचा विषय ओघा- ने आला असे वाटले, पण गप्पात रंगलेला श्री बोलता बोलता हळवा झाला. त्याचा स्वर जड झाला. त्यानं त्याचं बोलणं आवरतं घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता झाकोळली. डोळयात पाणी साकळले. ते लपविण्याचा तो प्रयत्न करीत होता. मी त्याच्या हालचाली निरखीत होतो. त्याचे असे वागणे मला थोडे थोडे परिचयाचे झाले होते, त्याच्या दुःखी मनःस्थितीची मला जाणीव होती. प्रेमविवाह करुन त्याला फक्त दुःख आणि विरह याशिवाय काही मिळाले नाही. त्यावेळी रुमालाने चेहरा पुसत तो मला म्हणाला, बाबू, माधवीची ओळख गॅदरिंगच्यावेळी झाली. तिचा स्वाभिमानी स्वभाव आवडला होता; पण त्याचा शेवट असा झाला. सर्वांनाच माझ्यामुळं दुःख सोसावं लाग- तंय, मी काय करु रे वाबूड? 6 तो गहिवरलाच मी सुन्न होऊन झन्याच्या काठावर असलेल्या पाणपक्षाकडे पहात राहिलो. त्याचा दुःखावेग ओसरल्यावर तो मला म्हणाला, 'चल, झन्यावर जाऊन, तोंड धुऊन पाणी पिऊन येऊ. 6