लागीर परमेश्वराची आपण सारी लेकरं. एक जातीची पाखरं कधी एक टोचून घायाळ अहो, पाखरं नाहीत ही, गिधाडं ! वास काढून मांस स्वार्थसाधू ! कधी एकमेकांना सखाणारी त्या वाक्यासरसी तेथे हरणासारखी वावरुन शालीनतेनं उभी असलेली नववधू विजेसारखी निघून गेली. तिचा संताप व स्वाभिमान तिच्या हालचालीतून ओसंडत होता. सारे सुन्न झाले. श्री गाडीत असून नसल्यासारखा थिजून गेला होता. तो मुका-वहिरा असल्याप्रमाणे निर्जीवपणे पहात होता. शहाण्या समंजस माणसांना नववधूचं एकच निर्वाणीचं उत्तर मिळालं होतं- 'मी सुद्धा दुसऱ्याच्या रक्तमांसाची अभिलाषा धरणाऱ्या गिधाडांना 'पाखरं' समजून त्यांच्यात मिसळणार • नाही. मामांनी दिलेले दाग-दागिने आणि पैसा माझ्या वडिलांनी घेतला नाही. त्यांच्या-त्यांच्यात त्यांनी त्यांच्याच खोट्या प्रतिष्ठेसाठी आरत्या ओवाळल्या. खोटी दूषणे मी ऐकून घेणार नाही. त्यांच्या मुलाची मी धर्मपत्नी आहे. काहीही सहन करुन घ्यायला मी गुलाम नाही, हे त्या विसरल्यात, मी विसरले नाही. विसरणार नाही. दोन्ही बाजूनी आगीत तेलच ओतले गेले. मध्यस्थांची स्थिती डमरुसारखी झाली. देण्या-घेण्याचा कर्ता-करविता मामा तेथे नसल्याने सारे दृढमूढ झालेले. मामांना शोधून आणण्यास सारे असमर्थ ठरलेले. शोधून सापडण्यासाठी ते गेलेलेच नव्हते, याची जाणीव सर्वांना झाली होती. शेवटी हतवल होऊन, नववधू तेथेच ठेवून, ओके बोके वऱ्हाड सुतकी चेहऱ्याने परत फिरले. दबक्या आवाजात गावभर चर्चा चालत होती. कोणी काकूंना दोष देई, कोणी मामांना, तर कोणी नववधूला, तर कोणी नववधूच्या पित्याला दोष देऊन मोकळे होत होते. काहींनी श्रीकांतला डरपोक आणि छचोर ठरवला. काकूं वाड्याबाहेर पडत नव्हत्या. श्रीकांतने तर घर धरले होते, आठ-दहा दिवस असेच गेले. एखाद्या साथीच्या दुखण्यातून उठल्याप्रमाणें सारे उदास होते. श्रीकांतकडे माझे जाणे-येणें असे; पण त्या लग्न-
पान:लागीर.pdf/१३
Appearance