लागीर १२३ हुता. मी म्हणायचे, 'नोकरी लागलं तवा लागलं. काळजीनं खंगू नका. ' सुलाचं नि त्येचंबी नोकरी लागली की लगीन करायचं आसं एकदा मी सुलाला म्हणलं, धोरण दिसत हुतं. 2005 'देवानं लवकर नोकरी लावून द्यावी.' ती खो खो हासत व्हायली. म्हणली, स " J 'तुझा देव कुठल्या कारखान्याचा मालक ? पोरास्नी काय कळतंय. समदा खेळ देवाचाच तर आसतो. लागल नोकरी. तवर सुलाचंबी कालेज पुरं हुइल.. ह्या दोन-तीन म्हैन्यात सुलासंग वसंता आला नाय. सुलाला मी एकदा बोलून दावलं तर म्हणली, माझी परीक्षा जवळ आलीय. त्येच्या नोकरीचं त्याला व्याप. ( मीच सांगितलंय वारंवार येणं बरं नाही म्हणून बाकी आम्ही भेटतोच की. ' आसं ऐकल्यावर मलाच इरमल्यावाणी झालं. मनाला म्हणलं, आपुनच पोराटोरापेक्षा जास्त उतावळपणा करतुया. तरणीताठी पोरं आसून ती किती समजुतीनं वागत्याती. नि आपुन आस पागल पणानं बोलायचं ह्ये काय बरं नाय. त्या दिशी सुलाची परक्षा संपणार हुती. येताना संग वसंताला आण आसं बजावून सांगितलं मी. माझं डोळं सारखं वाटंकडं लागलं हुतं. आखिरीस सुला कोपऱ्यावर दिसली. मोरानं पिसारा फुलवावा तसं झालं माझं. उठून बिगी बिगी दारात जाऊन उभी हायले. वसंता काय दिसला नाय संग. आसंल मार्ग म्हणलं; पण दारात शिरताना सुला म्हणली, ( ESTAC दारात कशाला उभी व्हायल्येस? रागात हुती जणु. वसंतावरचा राग आसंल म्हणलं; पण आत येताच तिनं खाटंवर आंग टाकून ढसाढसा रडायलाच केलं सुरु. सर्र- दिशी काटा आला माझ्या अंगावर काय झालं की म्हणलं, सुलाला पोटाशी धरलं. लाख इनवण्या केल्या; पण बोलायचं नाव घेईना. रडू- च आवरत नव्हतं तिला. मग मीबी कावलेच. म्हणलं,
पान:लागीर.pdf/१३०
Appearance