Jump to content

पान:लागीर.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर १२२ लागलं धडकायला. सुलाचं आई-बाप डोळयाम्होरं उभं -हायलं. म्हणलं काय पोरीनं खूळ घेतलं ह्ये; पण म्हणलं सारं इचारुन तरी घ्यावं. इचारलं, पोरगं कंच्या जातीचं? आपल्याच. आपल्यापैकीच कुळी. मग आला जरा जीवात जीव. नाव-गाव इचारुन घेतलं. आमच्या येळंला नव्हतं आसं काय. न कळत्या वयातच आई-बाप लग्न उरकायचे. आता शिक्षणासंग आसल्या गोष्टींचं लई पिक पिकायला लागलंय. पोरं आपल्या आपल्यात लगीन जमीवत्याती. घरच्यांनी आडीवलं तर पळून जाऊन लगीन करत्यात; नाय तर जीव देत्याती. सुला कुण्या वसंतावर जीव लावून बसली हुती तसं जगाआगळं काइ नव्हतं; पण पोरा- पोरीच्या वळखीचा काय भरवसा म्हणलं. सुलाला म्हणलं, 'त्यो कोण वसंता हाय त्येला पुन्ना येशील तवा संग घेऊन ये. ' वसंताला संग घेऊन सुला आली. पोऱ्या चांगला धट हुता. लाजरा-बुजरा नव्हता. बोलघेवडा हुता. पयल्या भेटीत काय गवसतं म्हणा; पण त्येचा बोलका सोभाव मला बरा वाटला. एकमेकावर जीव टाकणारी तरणी पोरं वंगाळ आसतील कशी? बुक शिकून शानी झाल्याली. सुला तशी पारख करण्यात फसणार नाय. जीव लावण्याजोगं काइतरी असल्याशिवाय का तिनं जीव लावलाय? पयल्या भेटीतच वसंताकडं माझंबी मन झुकलं. माझ्या सुलावाणीच त्योबी वाटला. मी त्येला सारं समजून सांगितलं. हासत हासत त्यो ऐकून घ्याचा. दोन दिवस दोघं आनंदात व्हायली. जाताना जोडीनं गेली. त्याला 'येत जा म्हणलं, त्योबी 'वरं' म्हणला. ती दोघं गेल्यावर शेजारच्या आयावा- यांनी चौकशी केली. मी म्हणलं, , BAR हाय आमचा लांबचा पावणा. त्येच्यासंगच सुलाच्या दादांनी लगीन ठरीवलया. ' आणखीबी काइबाय दिलं सांगून. पटलं त्येन्लाबी. बसल्या गप. नाय तर लागल्या असत्या पालीवाणी कुचकुचायला. सुलासंग आधनं-मधनं वसंता येत-जात हुता. मला दोघाचंबी कौतुक हुतं. वसंताला नोकरी नव्हती; पण त्यो नोकरीच्या तलासात