पान:लागीर.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर F ही हकीकत चार वर्षांपूर्वीची आहे. श्रीकांत उमाकाकूंचा एकुलता एक मुलगा. बालपणातच पितृछत्र हरपलेला. मामांच्याकडे पुण्याला शिकला सवरला. तेथे त्याचं एका कॉलेजकन्येवर प्रेम बसलं. भावाच्या मर्जीनुसार व मुलाच्या हट्टापायी उमाकाकूंनी लग्नाला सम्मती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार देण्या घेण्याचे व्यवहार ठरले. गंभीर चेहऱ्याच्या काकूच्या मनाचा ठाव लागत नव्हता. मानी स्वभावाच्या व्यवहारचतुर काकूं नात्याचे रेशमी बंध असे सहजासहजी तोडणाऱ्या नव्हत्या. इनामदार घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभेल असा विवाहसोहळा थाटात पार पडला. नववधूस घेऊन वन्हऱ्हाड निघालं आणि एकाएकी अतुफान वादळवारा सुटावा तस घडलं. काकूंनी रुद्रावतारच धारण केला होता. सारे गोंधळून गेले होते. एकमेकात कुजबुज वाढली. दोन्ही बाजूचे लोक जमले. वातावरण गंभीर झाले. काकूंचा आवाज चढला होता. एक दोघे वयस्क त्यांची समजूत मऊ शद्वात घालण्याचा प्रयत्न करत होते. जाणत्या बायकासुद्धा टवकारुन पाहात होत्या. काकूंच्या वाऱ्याला उभे राहण्याचे धैर्य एकीच्यातही दिसत नव्हते. काही छोटया घटनां- वरुन चाणाक्ष बुद्धीच्या काकूंनी ओळखले होते की, लग्नाचा सारा खर्च त्यांच्या बंधूनी केला होता. ती गोष्ट त्यांच्या मानी स्वभावाला रुचणारी नव्हती. त्या डिवचल्या गेल्या. नागिणी समान खवळून उठल्या. एकुलत्या एक मुलाच्या लग्नात अशी लपवाछपव, उसना डामडौल, म्हणजे त्यांना आपल्या प्रतिष्ठेची विटबंना वाटली. त्यांच्या आकांड तांडवात सारे थिजल्यासारखे चिडीचिप झाले. मामांना तिथे नाही. त्यांचे दोन तिन मित्र काकूंचा राग शांत करण्याचा प्रयत्न, करीत होते; पण त्या शांत झाल्या नाहीत. त्यांनी गाडीत बसलेल्या नववधूचा हात धरुन खाली उतरविले. सारा सूरच बिघडला. एक वयोवृद्ध गृहस्थ पुढे होऊन म्हणाले, 'ताई, असा त्रागा करु नका. देवा- ब्राह्मणाच्या साक्षीने ते जन्माचे जोडीदार झाले. ते सुखी, तर आपण सुखी देण्याघेण्यात काय सुख ? खर्च कोणीही केला असला, तरी स्वेच्छेने केला आहे. कोणी कोणावर जुलुम- जबरदस्ती केलेली नाही. गृहलक्ष्मी आज आनंदानं घरी येतेय, तिला आनंदानंच घरी घेऊन जा. एका येण्याचे धैर्यच झाले