लागीर १२१ आठवड्याला ठरल्यापर्मानं सुला येत हुती.. परक्षा-बरक्षा आली की एखादा शनवार चुकायचा. मग आठवडाभर माझ्या जीवाची दैना उडायची. आता शहरचं वारं लागलं हुतं. तिच्या राहणीमानात लांब फरक पडला हुता. सुला दिसली की मनात खळबळ हुयाची. कुणाचंबी चित्त चळण्यासारखा तिचा रुवाब असायचा. अशीच दोन वर्स भिरभिरत गेली. IFTT सुटीत आली की सुला लईच लाडात आल्यावाणीं करायची. मला वाटायचं माझ्यापास्न लांब हातीया. आल्यावर माझी माया पांघरुन पडावं वाटतं आसंल माझ्या बाईला. कुशीत शिरुन म्हणायची, 13 आता थोडं दिवस हायलेत. लगीन झालं की जाईन मी म्हणून मी तुझी माया अश्शी पांघरुन घेत्ये. माझ्या काळजात कालवाकालव हुयाची. सुरकतल्यालं हात थर- थरत तिच्या साऱ्या अंगावर्न मायेनं फिरायचं. वाटायचं माझ्या काळजा- तला ह्यो ठेवा कुणाच्या पदरात पडंल त्यो नशीबवान आसंल; पण ही नांदायला गेल्यावर, आपुन काइ लई दिस तग धरणार नाय. एका सुटीत सुला जरा जादाच खुशीत हुती. सारं बडाबडा बोलून टाकायचा तिचा सोभाव माझ्या माहितीचा हुता; पण त्या दिसी रात- ची जेवणं झाल्यावर सुला हातरुणावर पडल्या पडल्या हात-पाय चेपू लागली. म्हणलं, का ग आज आजीचा लई लाड आला काय? ! तर हळूहळू हासत -हायली. तिला कायतरी बोलायचं हुतं; पण दुसरंच कायतरी बोलून ती घुटमळत होती. मी म्हणलं, 'काय सांगायचं ते सपस्ट सांग. माझी शपथ हाय. ' तर म्हणली, "तू रागाला आलीस तर मी जीव ठेवायची नाय. ' माझं काळी- जच हाललं. म्हणलं, आसं काय हाय त्ये तरी सांग. मी नाय रागाला येणार. तुझ्या- साठी जीव गहाण ठेवीन.' तर आडपडद्यानंच माझ्या कानावर घातलं की, S कोणसं पोरगं हाय. त्येच्यावर जीव जडलाय. ' माझं काळीज
पान:लागीर.pdf/१२८
Appearance