Jump to content

पान:लागीर.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर १२० हुती; पण मला माझ्या गुतल्या जीवाचं कोडं सुटत नव्हतं. मी माझ्या मनाला सांगितलं, सुला आपली मागल्या जन्मातली लेक हाय. माझं मन दुथड्या नदीवाणी भरुन वाहू लागलं. सु सुलाला कुरवाळून मुक घेण्यात येळंचं भान हाइनासं झालं. सुला शाळंत जात हुती. वाढत हुती. बघता बघता पोर पातळं नेसू लागली. उफाड्याचं तिचं आंग भलतंच बांदंसूद दिसू लागलं. माझं सारं लक्ष तिच्यावर असायचं. तिचा पण माझ्यावर भारी जीव तिला आई-बापाचंबी येवढं काइ वाटायचं नाय. ममईला सुटीत जा म्हणलं तर मला संग नेण्यासाठीच हाटून वसायची. मला सोडून कधी ती ममईल गेली नाय. आपल्या आई-वापाच्या घरी ती पावण्यावाणी वागा- यची. बुजल्यावाणी जुजबी बोलायची. तिथंबी तिचं हिंडणं-फिरणं, खाणं-पिणं, झोपणं सारं माझ्या संग असायचं. तिच्या आई-बापाला आक्रित वाटायचं. दोघं लहानगं भाऊ टवकारुन बघायचं. येवढं करुनबी तिचं भागायचं नाय. परत गावाकडं चलण्याची तिचीच घाई चालायची. सई तिची आई नावालाच. मनातलं सारं ती माझ्याम्होरं बोलून टाका- यची. तिच्या मनानं मीच तिची आई हुते. तिला जपता जपता मी मलाबी जपू लागले. वाटायचं माझं काइ वाइट वंगाळ झालं तर माझी सुला मनच्या गोस्टी कुणाला बोलून दावील? आई-बापाजवळ हाइल! पण मनात झुरंल. मना इरुद काइ झालं तर झुंरुन मरंल. म्हणून तिचं लगीन होइस्तवर मला जगलं पायजे. त्यासाठी मी मलाबी जपत हुते. सुला मेट्रीक झाल्यावर कालेज शिकायला सातारला जाणार म्हणू लागली. तिच्या आई-बापाचंबी तसंच मत हुतं. माझं मातर काळीज आतल्या आत तुटत हुतं. माझ्या बोलण्यातून सुलाच्या लक्षात आलं. ती जरा मला तोडूनच बोलली. मी गपच झाल्ये. मग माझी समजूत घालू लागली. तसं मला ती नांदायला निघाल्यावाणी रडू आलं. ती माझी माया जाणून हुती. म्हणली आठवड्याला तुला भेटून जाईन. तेवढंच बरं वाटलं जीवाला. ती जाताना मनाला आवर घातला; ती डोळयाआड झाली नि मोकळया घरात मोकळ्यापणानं रडून घेतलं. त्या दिसापास्न शनवारची वाट बघायचा मनाला चाळाच जडला. पण