लागीर ११९ त्या वाळमूर्तीनं माझ्या मावळतीच्या दिसात माझ्यावर म्हवनी घातली. माझ्या सासू-सासऱ्याचा जमीनजुमला रग्गड हुता. मी नुसत्या देखरेखीवर हुते. धान्याची विक्री हुयाची. दर सुगीला बँकेत एका मुठीनं रक्कम पडायची. दुष्काळातसुद्धा डगमग होत नव्हती. माझ्या येकलीला कितीसा खर्च लागणार? त्यात सुलाला ठेवून घेतली. ती पाच वर्साची झाल्यावर तिला ममईला शाळंला नेण्याबद्दल तिच्या वाचा कागद आला. नि पायाखालची भूई फाटल्यावाणी मी खुळीबावरी झाले. सुलाला पोटाशी धरुन आसवास्नी वाट दिली. पोरगी मी रडल्याली वघून रडायला लागली; पण मलाच रडूं आवरत नव्हतं. माझं काळीज कुणीतरी कापून नेणार आसंच वाटतं हुतं. आईपण किती चांगलं नि किती वंगाळ? हातपाय गळून गेलं. त्या दिशी जेवले नाय. सुलाला पोटाशी धरुन रात माशावाणी तरमळून काढली. खुळयावाणी कायबी मनात येऊ लागलं. घरदार, जमीन जुमला इकावा नि सुलाला घेऊन परमुलखाला पळून जावं. तिच्या आई-बापाला काइ पत्ताच लागू देऊ नाय; पण शांतपणानं केला इचार. काय तरी म्हणलं आपली इपरीत बुद्धी. सुलाचा बाप हुशार माणूस. कुठं भागीनगरात गेलं तरी काढीलं मला हुडकून. मग काय पत न्हाइल आपली? त्येच्यापरता 'दादाआप्पा' करुन आपल्या जीवाची हालत त्येस्नीच सांगावी. सुलाला तिच्या लग्ना- पातूर माझ्याजवळ राहू द्या. शाळा शिकू द्या म्हणायचं. त्येस्नीच पाझर फुटंल. पावणा आब राखणारा हुता. बोलण्या-वागण्याला आदबशीर हुता. घेईल म्हणलं समजुतीनं. झालंबी तसंच. आलं सुलाचं दादा. माझ्या डोळ्याचं झरं झालं. दोनं-चार शब्दात मी माझं म्हणणं मांडलं. सारं मन काइ उलगडून सांग- ता आलं नाय; पण पावण्यानं घेतलं जाणून 'हाऊ द्या' म्हणलं सुला- ला. माझ्या म्होरं चार-पाच शंभराच्या नोटा धरल्या. तशी मी सरले मागं म्हणलं, 'सुला मला जड नाय. पैशासाठी संबाळली नाय. काळीज गुतत गेलं. मूळं काळजाला भिडली म्हणून तर देवावाणी तुमाला साकडं घातलं. नि तुमी पैसं म्होरं धरुन परक्षा घेता काय?' मग वरमलं मनात. जातायेळी पोरीसाठी उदास झालं हुतं. त्येंची रक्ताची माया
पान:लागीर.pdf/१२६
Appearance