Jump to content

पान:लागीर.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

THE STREETSIR PL BE DISTY TROTET? १०. वांझ मरण दर शनिवारी सुला साताऱ्यास्त याची. ती येणार म्हणून माझ्या अंगात वळ याचं. आळूस पळून जायाचा कुठल्या कुठं. सुला काइ माझ्या रक्ताची नव्हती. पोटपाणी न्हाइ पिकलं माझं झालंच तसं, मी शानी हुयाच्या आधीच माझं कपाळ पांढरं झालं. दिसाला खडं मार- ण्यात तरुणपण खपीवलं. सुला माझ्या पुतणीची पोरगी. सवा वर्साची हुती तवापास्नं माझ्याजवळ न्हायली. तिच्या आईला दुखणं लागलं. दवा-पाणी करायला नवऱ्यानं ममईला न्हेली. तान्ही सुला माझ्याकडं -हायली. ती माझीच झाली. म्होरं तिच्या आईला पाठपाठ दोघं पोरगं झालं; पण सुलाला माझा लळा लागला नि रापीटोपी दोन पोरं म्हणून न्हाइच आई-वानं सुलाला लगोलग न्हेलं; पण तीबी बाजिंदी, आई-वा- ला वळख देईना झाली. मी म्हणलं न्हाऊ द्या सुला माझ्याजवळ. मला- बी तेवडाच इरंगुळा वाटल. त्या उभयतानीबी माझं मन मोडलं न्हाइ सुला माझ्याजवळ न्हायली नि माझं वांझंचं घर वटक्या झाडाला पालवी फुटल्यासारखं टवटवीत झालं. सुलाच्या संगतीनं शेजारच्या पोरीबाळी माझ्या पडवीत खेळू लागल्या. वसाडीत केळबाग माजल्यावाणीच झालं. मला सुलाचं अप्रूप वाटू लागलं. ती जरा ती जरा डोळचाआड झाली तर माझं काळीज खालीवर हुयाचं. त्या आधी मी देवाधर्मात जीव गुतवला हुता; पण सुला आल्यापास्न देवाचाबी मला इसर पडू लागला. तिच्या बोवडया बोलण्या- त माझा जीव खुळावून गेला. बिन वेणाचं बिन पान्ह्याचं मला आईपण मिळालं नि कळालंपण. सुला बाळसंदार हुती. तिचा बांधसूदपणा नजरंत भरायचा. मोठ्यापाणी चांगली दणक्यावाई व्हणार आसं चिन्हं हुतं.