Jump to content

पान:लागीर.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ण्याची हीच नामी संधी. शिवाय वैनी-भाऊ आयुष्यभर आपल्या उप- काराच्या ओझ्याखाली राहतील. आपण धाकटे असूनही सारे घरदार आपल्या हुकमतीत राहील. अशी सुखस्वप्नाची गुलाबी दुलई उलगडत शिवाप्पा मध्याह्म रात्रीपर्यंत जागा होता. लागीर ११४ झुंजूंमुंजू झालं. थोरली मधली उठली. त्यांच्या चाहुलीनं वृंदा उठून बसू लागली; पण तिला उठता येईना. सारं अंग ठणकत होतं. ओटीपोटातून असह्य कळा येत होत्या. रात्रीचा प्रकार आठवून तिचे डोळे भरुन आले. झाडलोट करीत असलेली थोरली केरसुनी हातात घेऊन तिच्याकडे दुरुनच पाहत राहिली. मधलीसुद्धा तेथे येऊन उभी राहिली. वृंदाच्या जवळ जाण्याचं धाडस त्यांच्यात नव्हतं. त भित्रट थिजल्या नजरेला नजर देत वृंदा म्हणाली, त्यांच्या त्य + तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका; पण तो झुटींग म्हणतात तो काही मला लागलेला नाही. मी तुमच्यासारखीच ठीक आहे. मांझ्याजवळ या. अशा दुरुन काय पाहता? माझ्या पोटातून असह्य कळा येतायत. होवं. 'नाय बाय ! आमाला त्यातलं काय कळत नाय. तू रात्री वरडलीस. धाकट्या रावसायबांनी मंत्र-तंत्र केल्यावर तू सुद्धीवर आलीस. आमी डोळयानं पाहिलंय. शिवाय तुझ्याजवळ येण्यात आमाला धोका हाय. 'रात्री माझ्या छातीतून कळ आली म्हणून मी ओरडले हे खरं. थोडावेळ वेदनेनं मी गप्प झाले होते. हे पण खर आहे; पण बाकी सारं खोटं. मी भूताचं झाडंबीड काही नाही. मला तसलं काहीही झालं नव्हतं. तुम्ही तरी विश्वास ठेवा. त्या मारानं मात्र मला फार त्रास सुरु झालाय. पोटात दुखतंय माझ्या. माझ्या माहेरच्यांना ब बोलवा. विश्वास ठेवा. रच्या माणसांचं ऐकायला 'आमी विश्वास ठेवून काय मी पण घरचंच माणूस ना ! माझ्यावर ना बोलवा. त्यांना सांगेन मी. करू? - रात्रीचा प्रकार पुन्हा होऊ देऊ नका - - --- त्या थोरल्याबाई, विश्वास ठेवा माहेरच्यां- नाहीतर यातच मला मरण येईल.