लागीर ११३ येणार होता. तो व त्याचा धंदा बदनाम होणार होता आणि हेच त्याला सहन करणे शक्य नव्हते. या घमेंडखोर वैनीला आपण लवकर हिसका दाखवू असा त्याने मनोमन निश्चय केला. त्याच्या विचाराशी त्याची आई सहमत होती. प्रश्न फक्त संधीचा होता. तशी संधी निर्माण करणार होता. af आणि आयती संधी चालून आली. वृंदाच्या नवऱ्याचे भय त्याला नव्हतेच. तो शामळू स्वभावाचा व आईचा शद न ओलांडणारा. त्याला फिरवायला वेळ लागणार नव्हता. वृंदाला वेताने मारताना तिचा नवराच घायाळ झाला; पण शिवाप्पाच्या सांगण्यावरुन तो एकदम थंड पडला. शिवाप्पा त्याला 'बामणी शिकारी' म्हणायचा, ते खरं होतं. अ आता कोणाचीच मात्रा शिवाप्पापुढं चालणार नव्हती. 'झुटींगाच्या' नावाखाली तो वैनीवर पुरता सूड उगवणार होता. तिच्यासाठी त्याच्या भावानं मामा ची पोरगी नाकारली. पैसेवाली स्थळं नाकारली. आईला दुःखी केलं. ही सुशिक्षित वहिनी आपल्याच तोयात. दीर-भाऊ म्हणून मर्यादा पाळत नव्हती. चार पुस्तक शिकलेल्या शिवाप्पाला तो मोठा अपमान वाटे. बाईच्या जातीनं आपल्या पायरीनं असावं. पायरी सोडून वाग- णाऱ्या वैनीला झुटींगाच्या नावाखाली पुरतं झोडपून काढायचं ती पोटुशी म्हणून आई घाबरते; पण काही होत नाय! या शिकलेल्या बायकांचे नखरे कळायचे नाहीत. तशी दुनिया आंधळीच. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. आता या शिवाप्पाचचं पहा. देवरुसपणाची विद्या वगैरे काही प्रकार नसतो. जादूगारासारखं लोकांना आपल्याकडं आकर्षित करायचे. मंत्रोच्चार करायचे. लिंबू, गुलाल पाहून बोबडी वळणारी माणसं ! त्यांना आणखी काही भयावह सजावट दिसली की, ते मनातून गारद! त्यापुढील भाग फारसा अवघड नसतो. जी व्यक्ती आजारी ती मनानेच आजारी असते. क्वचित शरीर पीडा असते; पण आपण म्हणायचं 'लागीर! झपाटलंय. त्याच्या तावडीतून सुटका अव- घड. ' की पूजेच्या नावाखाली भरपूर पैसा मिळतो. तेथे शंका नाही. घासाघीस नाही. विना तक्रार. बिनबोभाट सारं मनासारखं घडवता येतं. 'वैनी ' आपल्या पेचात आलीय. तिच्या बापाकडून पैसा उकळ-
पान:लागीर.pdf/१२०
Appearance