पान:लागीर.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ लागीर ११२ तशी शिवाप्पालाही झोप नव्हती. तो स्वतःवरच बेहद्द खूष होता. वृंदा ही त्याची नवी वहिनी शिकलेली. आजवर त्या घरात कुणी शिकलेली बाई नांदायला आली नव्हती. बायकाची अक्कल चटणी -मिठापुरतीच; पण त्याच्या या वैनीनं घरात नवंच वारं आणलं. गडी माणसासमोर पेपर वाचू बघायची; पण सासू हुशार. तिला तिथल्या तिथंच दटवायची. चारजणी घरी येऊन बसल्या की, ही वैनी हुशारीनं बोलायची. खेड्यातल्या अडाणीपणाच्या गोष्टींवर बोलायची. आया- वायांना पटायचं. आता ही वरचढ होईल. डोईजड होईल. जंड जाईल. आपल्यासारख्याला तर लई जपून रहायला पाहिजे. तिच्या अशा विचारानं शिवाप्पा धास्तावला. तो देवरुसपण करायचा. गंडेदोरे द्याय- चा. खेड्यातील श्रद्धाळू लोकांचा विश्वास बसायचा. भूत-पिशाच्च, करणी-भानामती, यासारख्या गोष्टींबद्दल शिवाप्पा आपला दबदवा निर्माण करुन होता. अडाणी लोकांकडून पैसा मिळत होता. दिवसभर गावभर फिरणें. देवरुसपणावर बक्कळ पैसा मिळवणे. घरच्या बाया- माणसांना दम देणे यात त्याचं आयुष्य सुखानं चाललं होतं; पण ही वृंदा वैनी आली. त्याच्या धंदयावर जणु आफत आली. शिवाप्पाचा देवरुसकीचा धंदा म्हणजे काचेच भांडं. एकदा विश्वासाला तडा गेला की, संपलं. आजपर्यंत त्याला त्याची फिकीर वाटली नाही; पण नवीं वैनी आली नि तो अस्वस्थ झाला. तिच्या प्रत्येक गोष्टीकडे त्याचं लक्ष असं. त्याच इराद्यानं त्यानं तिच्या माहेर- ला पाठवायचं पत्र फोडलं. त्यातील मजकूर वाचून त्याचं मस्तक गरग- रलं. त्यात खोटं काहीच नव्हतं; पण जे खरं असूनही लिहू नये तेच तिनं केलं होतं. 'सासरी पहाटेपासून कामाच्या रगाड्यात असते. पहाटे जात्यावर दळावे लागते. तो त्रास सोसवत नाही. देवरुसपणाचा फसवा धंदा घरात राजरोस चालतो. लोक असंस्कृत वाटतात. सासूबाई लग्ना- तील उणी-दुरी काढून टोचून बोलतात.' वगैरे मजकुर त्यात होता. तसं हिला तिथं कायमचं रहायचं नव्हतं. महिना दोन महिने गावी आल्या- नंतर काम करण्यात कसला आला आहे त्रास? पण सुशिक्षित पणाची ऐटच रक्तात. तिच्या त्या पत्रामुळे शिवाप्पाच्या आईवर रोष ---