लागीर १९९ होती. तिचा मूक आक्रोश तिला जणु पाठीतून ऐकू येत होता. शिवाप्पा आत आला. त्याने डोळे वटारुन थोरलीकडं पाहिले. आणि आईपुढे जाऊन तो मोठ्याने म्हणाला, 'लागीर आपली समद्यांची फसवणूक करतंय. चकवा देतंय. झाडाला चांगल्या माणसावाणी बोलाय लावतंय; पण झाडाला कुणी झुटींगाचा संचार जवळ घेऊ नका; नाहीतर जवळ घेणाराच्या शरीरात ३ होईल. ते लई जड जाईल. इतका वेळ संभ्रमीत झालेला, अर्धमेला झालेला वृंदाचा नवरा ते ऐकून नखशिखांत थरकून गेला. उभा राहिलेली जागा सोडून तो दूर जाऊन उभा राहिला. आता थोरलीपण धाकटीपासून सुटका करुन घेऊन चुलीजवळ जाऊन बसली होती. आता तिच्याकडं पाहणाऱ्यांची दृष्टीच बदलली होती. एखाद्या हिंस्त्र प्राण्याकडे पहावे तसे प्रत्येकजण दुरुनच तिच्याकडे निशद्वपणे पहात होता; पण आता विचार करण्याची शक्तीही तिच्यात नव्हती. पोत्यावर तिने अंग टाकले. तिला ग्लानी आली आणि सर्वजण तिला तशीच टाकून आ आपापल्या सुरक्षित जागी जाऊन झोपी गेले. वाशी वृंदाच्या नवऱ्याची कितीतरी वेळ झोप लागली नव्हती. बाल- पणापासून त्याने भूत- लागीराचे प्रकार त्या आपल्या छोट्या गावात पाहिले होते. पुण्याला शिकायला गेल्यानंतर तो ते विसरला संबंधही पाहुण्यासारखा येऊ लागला होता; पण आता हे फार भयानक झालं. प्रत्यक्ष वृंदा! त्याची बायकोच तिकाटण्यावरच्या झुटींगानं झपा- टली होती. तो मनातून उन्मळला होता. त्यांच्या लग्नालाच घरच्यांचा विरोध होता. तिला पटवून घेण्याची दयाबुद्धी आईकडे नव्हती. म्हणून मुद्दामच त्याने पंधरा दिवस वृंदाला एकटीलाच गावी पाठवले. 'ताण- तणाव कमी व्हावा. मने निवळावीत.' असा त्याचा उद्देश होता; पण हे असं घडलं. आई म्हणते तेच खरं या खेड्यातल्या लोकांना कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. मग देव घाल, भानामती कर, झुटिंग बसव असले प्रकार करतात. आपलंही सुखं कुणाला पाहावलं नसेल. कितीतरी वेळ तो या कुशीवरुन त्या कुशीवर होत होता.
पान:लागीर.pdf/११८
Appearance