माणसे घरात धावली. पळापळीत लहान मुले तुडवली गेली. एकच गोंगाट झाला. कोणी 'विंचू: (55' म्हणून तर कोणी 'साऽऽप ! साऽऽ प! ' म्हणून आरोळ्या ठोकल्या. हलकल्लोळ उसळला. कोणीतरी पेठेत धावले. पिंपळांच्या पारावर गावटग्यांबरोबर गावगप्प मारीत बसणाऱ्या वृंदाच्या दीराला - शिवाप्पाला कडे धावला. खवर पोचली. तो भुंग्यासारखा घरा- वाड्याच्या दरवाजातून दोन ढंगातच शिवाप्पा घरात घुसला. धरणीवर आडव्या पडलेल्या वैनीकडं त्यानं पाहिलं. घराच्या वाशात खोवून ठेवलेला वेत त्यानं ओढला. वृंदाभोवती कोंडाळं करुन उभी राहिलेली माणसं वाजूला झाली. हाय ! ' शिवाप्पानं वृंदा- मला बघू द्या भोवती वेतानं रिंगण काढलं. लागीर १०७ --- ( माझं पूजेचं साहित्य आणा. } आत्याबाईनं मधल्या बाईस खुणावलं. ती तत्परतेने आत गेली. ' गंपा, तू मागं जाऊन लिंबाचा ढाळा आण. सांगण्यावरुन गणपा झपाट्याने बाहेर गेला. आत्याबाईंच्या पाण्याचे एकदोन हाबके तोंडावर बसताच वृंदाने डोळे उघडले. तिच्या हातास घरुन शिवाप्पानं तिला वसती केली. तो मंत्र पुटपुटत होता. सर्वजण गंभीर झाले होते. पितराचे दगड मांडले गेले. पाणी शिंपडून त्यावर गुलाल उधळ- ला गेला. घरभर सुगंधी धूप पसरला. दोन लिंबे कापून ठेवली. एक ●अखंड लिंबू गुलालाने माखून ठेवले. सुया-बिब मांडले गेले. उदबत्त्या पेटवल्या गेल्या. वृंदाला गुलाल लावला. ती सुन्न बसून होती. लिंबाच्या डहाळीने घरभर धूर पसरवत शिवाप्पा मोठ्याने मंत्र म्हणू लागला. • सर्वांचे श्वास रोखले गेले. छातीतील ठोके वाढले. सुन्न बसलेल्या वृदा- कडे शिवाप्पा रोखून पाहू लागला. मंत्राचा वेग वाढला होता. अचानक त्याने मूठभर उडीद घेऊन तिच्या अ अंगावर मारले आणि तिची नजर आग ओकू लागली. काल सकाळचाच तर प्रसंग. वृंदाने माहेरी लिहिलेले पत्र शिवा-
पान:लागीर.pdf/११४
Appearance