Jump to content

पान:लागीर.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर १०६ जन्माला येणं मोठं पापच असतं जणु - भाजी संपली होती. भात पुरेसा नव्हता. शिळ्यांना पुरवणी म्हणून काही ताज्या भाकरीही शिल्लक होत्या. सासूबाई सोडून सर्वांच्या ताटात शिळ्या भाकरी विभागल्या गेल्या. पातेल्यात रस्सा तेल-खोवऱ्याविणा तिखटपाणी उरवून होता. थंडगार जेवण. तणावपूर्ण वातावरण. घास घास विनगोघाट पोटात ढकलले जात होते. दोघी जावांनी भांडी घासून शेजारच्या खोलीत अंथरुणावर अंग टाकलं. थोरलीनं झाकपाक केली. वृंदानं झाडलोट केली. उकाड्यानं जीव हैराण झाला होता. सारी मंडळी अंगणात झोपली होती. अंगणा- च्या कोपऱ्याला वळचणीखाली थोरलीजवळ वृंदा झोपणार होती. वाकळ अंथरली होती. चिंध्याच्या जडशीळ उशा तीवर धोंड्यासारख्या मांड- ल्या होत्या. पहाटेपासून शरीर आंबून गेलं होतं. केव्हा एकदा अंथरुणा- वर अंग टाकू असं वृंद्राला झालं होतं. त्या दोघी अंगणात गेल्या; पण तेवढ्यात गावातला कोणी गडी माणूस आला नि नाकापर्यंत पदर ओढून त्या दोघी जावा मधल्या माळीत आल्या. वृंदाचा पती, सासू व तो माणूस गप्पात रंगले. रात्र चढू लागली होती. थोरलीनं पोतं पसरुन त्यावर अंग टाकून दिलं. ती संथ लयीत घोरु लागली. वृंदा शेंगाच्या पोत्यावर वसून भिंतीला टेकली. तिचीहीं डुलकी लागत होती. अंग अवघडून गेलं होतं. आठवा महिना लागला होता. नववा महिना लागेपर्यंत तिला इथंच दिवस काढावे लागणार होते. इथं आल्यापासून पहाटेपासून मध्याह्म रात्रीपर्यंत तिला उसंत मिळत नेव्हती. जात्यावर दळणे तिला अधिकच त्रासाचे वाटत होते. अचानक तिच्या ओटीपोटातून छातीकडं एक बारीक कळ सरकली ती सावरुन बसली. अंगणात हळुहळु गप्पा चालल्या होत्या. तिनं पोल्या- बसूनच थोडं वाकून अंगणात पाहिलं आणि छातीत जोराने कळ आली. छातीवर हात ठेवून तिने असहाय्यपणे तोंड वासले नि नंतरच्या जीव पिळवटून टाकणाच्या कळीने तिने किंकाळी फोडली. काय झाले नि काय नाही, हे कळायच्या आत ती धरणीवर आडवी पडली. अंगणातील