लागीर १०५ छातीत कळ इथं डॉक्टर - - BEN FTIP STE TOT ISTESE ““अं हं ऽऽ हं! डाक्तरचं नाव काढायचं नाय. त्यो औशीद देऊन दुखणं वाढावतो नि माणसास्ती पैसं देऊन खेटं घालणं भाग पा पाडतो - खरं नाय वाटत? - आत्याबाईच म्हन्त्यात! 1 " पण मी कशी गप्प बसणार - ( बघ बाई, आज पुण्यास्नं गुलाबराव आलं की सांगशीलविंगशील. समदं पालथ्या घड्यावर पाणी! फुकट शिव्या खाशील त्या मायलेकरां- च्या. देवाऽऽ रे! मग मी मरणार असल्या घोळात तिच्या कंठाशी हुंदका दाटला. 'एss गप्प ! आसं डोळं गाळूने भरल्या रामपान्यात. उगी, आत्याबाई ऐकून येत्याली - वणवा पेटलं. उगी गप्प ! --- जा चूळ भरुन ये. उरल्यालं दळून घेऊ. ऊठ FTS 1779 कठपुतळीसारखी वृंदा उठली. चूळ भरुन जात्याच्या पाळीजवळ पाय पसरुन बसली. जात्याची घरघर सुरु झाली. जीवाच्या करारानं ती जातं ओढत होती. हत्तीच्या पायाला हरीण बांधून आढाव ओढावं तसंच चाललं होतं. संध्याकाळी वृंदाचा पती पुण्याहून आला होता. विझत्या दिव्यात तेल ओतल्याप्रमाणे वृंदाचा चेहरा उजळला. सासूबाईंशी गप्पा मारणा- न्या आपल्या पतीकडं ती भावभरल्या नजरेनं पाहू लागली; पण त्यानं तिची नजर चुकवली. तो आईकडं पाहून हसत हसत बोलत होता. ते बोलणें बळेबळेचं होतं. ते हसू खोटं खोटं होतं. किती केविलवाणा प्रयत्न ते तो करीत होता. त्याला आपल्या पत्नीकडं पाहून मोकळं हसण्याची हिमत असू नये? याला आपण आपली व्यथा काय सांगणार? आणि त्याला कळणार तरी कशी? ती • खाल मानेनं कामा- झाली स लागली होती. नवरा. रात्री पहिली पंगत नेहमीप्रमाणे पुरुषांची - तिचे चार दीर व दुसरी मुलांची तिसरी स्त्रियांची जावाजावा चारजणी, पाचवी सासू जेवणाच्या वेळीही एक अदृश्य, अनाम तणाव ! स्त्री म्हणून
पान:लागीर.pdf/११२
Appearance