पान:लागीर.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'अस्सं! का बरं? ' माहेरच्या माणसावर गाईलेत्या ओव्या त्यास्नी कशा ऐकुशा वाटत्याल? ( मग सासरच्या माणसावर गीत गा की. ' 'तिथं का भाकरी थापायच्या हाईत? घेतला पीठाचा गोळा की थापला! ह्या घरातल्या हुबलाक माणसावर कुणाला गीत सुचंल का? व्वा! बाईसाहेब, म्हणून का तुम्ही मला तोफेच्या तोंडी देता?' तसं नाय ग. तू नवी हाइस, पोटुशी हाइस. नव्यापणी नवऱ्या- च्या मागं गेलीस. आता आठ-नऊ महिन्यांनी आलीस. नवंपण मोडलं नाय अजून तुझं. त्यात तुझं गीत खपून जाईल. ' ( ( तेवढ्यासाठी मी गावं? ' तसं नव्हं ग. तू गाईलस तर माझ्याबी जीवाला बरं वाटंल. मुकाट्यानं जातं वढलं आसं आत्याबाई म्हणणार न्हाइत.. म्हणजे आत्याबाई खूष होतील अशी गीतं तुम्ही आळेबळेच 20 गाता तर ( लागीर १०३ --- आता गाशील की, माझाच पंचनामा मांडशील? हो ना करता वृंदा गायला तयार झाली. हलक्या सुरावटीत ती गाऊ लागली- L उगवत्या सूर्यदेवाऽऽ साऱ्या दुनियेचं बरं करं थोरल्याबाईंनी तिच्या सूरावर साथ केली. वृंदाने दुसऱ्या ओळी- ची तान घेतली- 24 J 'तान्हुली माझी बाळं त्याच्या मागून हाती धर त्याबरोबर थोरलीनं हातातला खुंटा सोडला, नि खोऽऽ खो हसायला सुरुवात केली. वृंदानं जातं थांबवलं. ती भांबावून थोरल्या बाईकडं पाहत राहिली. थोरली पोट धरुन हसतच राहिली. धाकटीनं ओवी गाईली. तिचं काय चुकलं? भाबडेपणानं ती आवाक् होऊन पहात होती. शेवटी आपलं हसू दाबून थोरलीवाई म्हणाली- खुळी काय ग तू? अजून तुझी कूसबी उजवली न्हाय नि तुझी तान्हुली बाळं देवाजीनं कुठं शोधावी ग? ,