लागीर १०२ गीतातून ही चालायची. सौभाग्य जपायचं म्हणजे पुढल्या जन्माची तरतूद केल्याची भावना! वृंदाला मायेनं न्हाऊ-माखू घालताना ती कधीच सोमवारी घालायची नाही. जाणीवपूर्वक सोमवार टाळायची. विचारलं तर तिच्या ओव्या साक्षीदारासारख्या तत्परतेने पुढे यायच्या- सोमवारी न्हाली नार पाणी लागलं पिंडीला कुण्या नारीला नाही बंधु गिरजा विचारी शंकराला. ' नाहीतर- C 'सोमवारी नार न्हाली पाणी बेलाच्या झाडाला कुण्या नारीला नाही पुत्र कोडं पडलं शंकराला ' देवाधर्माच्या गोष्टींचा तिच्यावर जवरदस्त प्रभाव कसलीच शंका काढायची कुणाचीही आईसमोर धडगत नसायती. साऱ्या पु पुराण कथांचे संदर्भ ती जात्याच्या घरघरीत संगीतमय करायची, L अंबिकेला गेली राजा भिमकाची वाळ द्वारकेच्या नारायणा रथा चढूनी वाली माळ वाणी तर अशी चित्रवती की एकेका अलौकीक प्रसंगाचा सोहळा मनःचक्षूंना धन्य करायचा. गांजली दुरपती कृष्णदेवाला कळलं पोथी ग वाचताना पान हातचं गळलं ' का ग, जाऊबाई, ध्यान कुठेय तुझं? आज गुलाबराव येणार म्हणून सप्नात जाया लागलीस का? } 'छट्! काहीतरीच काय- ( अग, तसं नव्हं. फिरत्या जात्याच्या पाळीवर बसलूया. तू नाय सवाष्णीनं. काय कायबी बोलंनास. आसं मुकामूकाट्यानं जातं तरी ओवी गा की. माझी चेष्टा करता की काय तुम्ही ! आहो, मी कधी जातं ओढलं नव्हतं. ओवी गाणं तर दूरच. तुम्हाला सवय आहे. तुम्ही म्हणा मागून म्हणते- साथ देते. म्हणले आसते ग. पण मला जी गीतं येत्याती-गाविशी वाट- त्याती ती आत्याबाईस्नी ऐकवत न्हाइत. वढू
पान:लागीर.pdf/१०९
Appearance