पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/464

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘जिंदगीका साथ निभाता हुवा' चालणारा होता. सुरैय्याच्या प्रेमभंगानं तो काही गुरूप्रमाणे खचून गेला नाही की आयुष्याच्या उत्तरार्धात त्यानं १९८० ते २०१० या तीन दशकात त्याचे सातत्याने दोन डझनभर चित्रपट फ्लॉप झाले तरी त्याच्या मनाला निराशा स्पन गेली नाही. हा नाही, पण पुढला चित्रपट हिट होईल हा त्याचा आशावाद शेवटपर्यंत कायम होता. 'Romancing with life!' असं त्याच्या रसील्या आत्मचरित्राचं मुळी नावच होतं. तो आयुष्यभर जीवनाशी रोमान्स करीत राहिला.त्याचा हा आशावाद थोडा जरी त्यानं जिवलग मित्र गुरूदत्तला दिला असता तर? - यात तसा काही अर्थ नाही. प्रत्येकाचं मन व भावना या वेगळ्याच मुशीतून तो निर्माता सिद्ध करीत असतो. त्यानं गुरूला अस्वस्थ, उदास, लहानसहान दु:ख - आघाताना खचून जाणारं, व मुख्य म्हणजे या दुःख - व्हिक्टीमहूडचं आकर्षण वाटणारं घडवल,त्यात गुरूचा तरी काय इलाज होता?
 गिरीश कार्नाडनं नसरीन मुन्न कबीर यांच्या गुरूदत्त-ए लाईफ इन सिनेमाच्या निमित्तानं गुरुदत्तच्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळं पण मर्मभेदी विवेचन केलं आहे. गुरू एकाच वेळी ‘हॅम्लेट' व 'देवदास' सिंड्रोमनं पछाडलेला होता. हॅम्लेट' म्हणजे 'To be or not to be' चं चिरंतन द्वंद्व, तर देवदास सिंड्रोम म्हणजे कमालीचे तीव्र संवेदशील मन, आत्मनाशाची प्रबळ प्रेरणा आणि स्वत:वरचं प्रेम करणारं नारसिस्टिक व्यक्तिमत्त्व. गुरूला दोन्ही व्यक्तिमत्वांचे बरीच गुण चपखल बसतात. हे जर खर असेल की वहिदा व त्याचा निकाह (पहिला लग्न विच्छेद न करता) होणार होता, तर त्यानं कच का खाल्ली व माघार घेतली,ज्यामुळे वहिदाचा तीव्र मनोभंग होऊन त्याच्यापासून अलग झाली... याचं उत्तर कदाचित अब्रार अल्वी देऊ शकला असता.पण त्यानं यावर आयुष्यभर सूचक मौन पाळालं. आणि वहिदानं ‘डिग्निफाईड मोन.

 कार्नाडांच्या मते त्याच्या अनेक सिनेमात त्या सिनेमाचे नायक व देवदास सिंड्रोमनी त्या व्यक्तिरेखेला ‘स्वदये'च्या (Self Pity) सीमारेषेपर्यंत नेलं आहे. १९६० नंतर कदाचित कार्नाडांच्या मते गुरूदत्तच्या प्रतिभेला ओहोटी लागली असावा व त्यात वैयक्तिक जीवनाचा पेचप्रसंगाचं सावट मनावर काळजी धरू लागलं होत.याचवेळी सत्यजीत रे च्या नववास्तववादी, गाणे व ग्लॅमर विरहित सिनेमानं जगभर त्यांचं नाव झालं होतं. गुरूदत्तमध्ये अशी प्रतिभा असूनही त्याचे सिनेमे हिंदी असल्यामुळे व त्याला गीत - नृत्य व मित्रप्रेमापोटी जॉनी वॉकरसाठी प्रत्येक सिनेमात रोल निर्माण करून पेरलेल्या विनोदामुळे आपल्या सिनेमातली कलात्मकता झाकोळली जात, याच भान व वैषम्य असणार - त्याच्या मृत्यूनंतर ‘प्यासा' व ‘कागज के फूल की क्लासिक सिनेमे म्हणून जगानं डोक्यावर घेतले, पण त्याच्या जिवंतपणी त्याला है कलात्मक यशाचे समाधान खचितच लाभले नाही. खरं तर, त्यानं याचं वैषम्य वाटून घ्यायचं काहीच कारण नव्हतं. कारण हे दोन सिनेमे त्याच्या काही उणिवांसह थार व

लक्षदीप ■ ४६३