पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/456

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त, पण मनस्वी विचार.
 आजवर थिएटरमध्ये रिलीज न झालेला शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित हा सिनेमा गेले वर्षभर विविध फेस्टिव्हल व आस्वादक शिबिरांत चर्चिला जात आहे. मी असाच तो फेस्टिव्हल व खास स्क्रिनिंगमध्ये दोन वेळा पाहिला. पहिल्यांदा पाहिला, तेव्हा किती तरी वेळ मी जळजळत्या वास्तवाच्या विदारक दर्शनानं सुन्न झालो होतो. दुस-यांदा पाहिला. तेव्हाही तो प्रभाव तेवढाच उत्कट होता. त्यातील बारीकसारीक दृश्यमालिकांनी व मधूनच स्वाभाविकपणे होणाच्या ‘ब्लॅक ह्युमर'मुळे प्रभाव अधिकच गडद होत होता.
 मृत्यू हे माणसाच्या जीवनातलं एकमेव शाश्वत सत्य. मृत्यूनंतर माणसाच काय होतं, हे न सुटलेलं कोडं आहे. त्यामुळे मृत्यूभोवती अनेक मिथकं रचली गेली व अंत्यसंस्काराचे कर्मकांड अस्तित्वात आढते. आणि ते पिढ्या दर पिढ्या घट्ट हात गेले. विशेषत: हिंदू धर्मात सरणावर प्रेत जाळण्याचा अंत्यसंस्कार मला जितका भीषण मोहक वाटतो, तेवढाच त्रासदायकही वाटतो. जस्ट इमॅजिन - जवळच्या माणसाच्या अंत्यसंस्कारात तुम्ही सामील आहात. तिरडी रचणे, त्यावर प्रेताला स्नान घालून व नूतन वस्त्रे घालून प्रेत तिरडीवर ठेवत ते करकचून बांधणे, स्मशानात लाकडाचा विशिष्ट पद्धतीने चिंता रचणे, त्यावर प्रेत ठेवून प्रदक्षिणा घालणे; भरलेलं पाण्याच मडकं मागे न पाहता फेकून देणे व ते मग फुटणे, तूप व केरोसिन टाकत अग्ना प्रज्वलित करणे आणि कवटी फुटण्याचा आवाज येईपर्यंत थांबणे... या साच्या प्रसंगांतून हिंदू समाजाची माणसं कधी ना कधी गेली असणारच. मीही गेलो आहे व प्रत्येक वेळी मला या कर्मकांडाचा प्रचंड त्रास झाला आहे. अशा वेळी जीवनाचा क्षणभंगुरता - ज्याला ‘स्मशानवैराग्य' हा शब्दप्रयोग योजला जातो - जाणवत... कदाचित या तपशीलवार, मन उदास - खिन्न व किळसवाणं करणाच्या कर्मकांडाचा तोच हेतू असावा का? मला माहीत नाही.
 पण स्मशानात राहून सरण रचणं, त्यासाठी लाकडं फोडणं व त्यावरच उपजीविका करणाच्या माणसाचं हे भागधेय जेव्हा त्याला जातीच्या उतरंडीत कानप्छ जातीचं स्थान प्रदान करतं व त्यातून सूटकेचे सर्व मार्ग समाजव्यवस्था बंद करत, तेव्हा त्याचं जगणंही तेवढंच विदारक व भयानक शोषणाचं होऊन जातं.

 अशाच एका स्मशानभूमीत चिता पेटविणारा श्रीपती व त्याच्या कुटुंबाची कथा ‘धग'मध्ये अत्यंत संयमी, काटकसरीपणानं पण थेट अंगावर येईल अशा दाहकतन मांडली आहे. बाबा भांड यांची ‘दशक्रिया' ही कादंबरी किंवा प्रेमानंद गज्वाच्या ‘किरवंत' नाटकापेक्षा हा सिनेमा खुप वेगळा, अधिक सखोल व प्रत्ययकारी आहे.कदाचित ही चित्रमाध्यमाची ताकद असेल; पण दोन तासांच्या अवधात बापु नियमांना फाटा देत तथाकथित ‘रिलीफ' क्षणभरही देण्याचं पटकथाकार नितीन दीक्षित

लक्षदीप ■ ४५५