पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/455

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. 'धग' - सुन्न करणारा प्रभाव!br>


 गाण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि कालखंडात कुणाही व्यक्तीला त्या वेळचे त्याचे मन, भावना व बुद्धीला वेगवेगळी नाटके, घटना, साहित्य व सिनेमा प्रभावित करीत असतात. हे मलाही तेवढंच लागू आहे.
 सिनेमाचा विचार करायचा झाला, तर जेव्हा गुरुदत्त त्याच्या मृत्युपश्चात आठ-दहा वर्षांतच दंतकथा बनू लागला होता, त्या सत्तरीच्या दशकात, माझ्या नव्हाळीच्या किशोर कालखंडाच्या वयात ‘प्यासा'ने मला वेडं केलं होतं. आजही हा चित्रपट मला तेवढाच भावतो; पण प्रभावाखाली न येता तटस्थतेने आज पाहता येतं! भावनाप्रधान कविमनाच्या नायकाची पैसा व यश हे मूल्य महत्त्वाचे मानणाच्या जगात होणारी रोमॅटिक ट्रेजेडी तेव्हा मनावर अमिट छाप सोडून गेली होती. आज मला ‘प्यासा'पेक्षाही गुरूदत्त व त्याचं वैयक्तिक अप्राप्याचा ध्यास घेतलेलं जगणं जास्त प्रभावित करतं. ज्या सिनेमानं माझी सर्वप्रथम ‘न्यू वेव्ह' सिनेमाशी ओळख करून दिली, तो श्याम बेनेगलस ‘अंकुर' मला महाविद्यालयीन जीवनात कमालीचा प्रभावित करून गेला होता. ग्रामीण भारतातील ऐतखाऊ व सुखलोलुप जमीनदारांकडून दलितांचं होणारं शोषण बेनेगलांनी अत्यंत प्रभावीपणे थेट मांडलं होतं. आज काळाच्या ओघात त्याचा प्रभाव निश्चितच कमी झाला आहे. अंगभूत स्त्रीसामर्थ्याचं दर्शन ताकदीनं घडविल्यामुळे जब्बार पटेलांचा ‘उंबरठा' व महेश भटांचा ‘अर्थ’ मला काही काळ प्रभावित करून गेले होते. माझ्या ऐन तारुण्यातला प्रचंड प्रभाव पाडून गेलेला चित्रपट म्हणजे एक दूजे के लिए. अतार्किक वाटावी एवढी प्रेमाची उत्कटता ज्या प्रभावीपणे या चित्रपटात के. बालचंदर यांनी चित्रित केली आहे, तिला आजही तोड नाही. माझ्या मते, हिंदी सिनेमाच्या संदर्भात प्रेमकथा मांडणारा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट - अर्थात बॉलिवुड सिनेमाच्या चौकटीत आहे, हे माझं ठाम मत आहे.

 पण कोणतेही गिमिक न वापरता जळजळत्या वास्तवाला भेटपणे भिडणारी कलाकृती - मग ती साहित्य असो वा सिनेमा - मला जास्त भावते. अलीकडच्या काळात मला प्रचंड प्रभावित करून गेलेला चित्रपट म्हणजे 'धग'. त्याबद्दल हे माझे

४५४ ■ लक्षदीप