पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/457

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटलानं टाळून विषयाचा आशय व प्रभाव जराही पातळ होऊ दिला नाही.
 श्रीपतीचं घर स्मशानभूमीतच, गावक-यांनी अंत्यविधी करण्यासाठी जागेसह दिलेलं. हाच त्याचा उपजीविकेचा पिढीजात व्यवसाय आहे. जेव्हा गावात माणसे मरतात, याची कमाई होते. प्रत्येक प्रेत जेव्हा जाळण्यासाठी त्याच्याकडे येतं, तेव्हा त्याची विधवा आई ‘मृतात्म्याला शांती मिळो व आमचं पोट असंच भरो' असं विठ्ठलाला मागत राहते; ते ऐकताना अंगावर काटा येतो. पण त्याला, त्याची बायको यशोदाला आपला मुलगा कृष्णानं हा व्यवसाय पुढे चालवू नये, असंच वाटत असतं.त्यामुळे त्याला शाळेत घातलं आहे, पण तिथेही जात व व्यवसायावरून विद्यादान करणारे मास्तर जेव्हा बोलतात, तेव्हा कृष्णा ऊर्फ किस्ना त्याला ताड्कन ‘उद्या तुम्हालाही मेल्यावर आमच्याकडे यावं लागेल, तेव्हा मीच तुम्हाला जाळणार आहे,हे लक्षात ठेवा' - असं बजावून बाहेर पडतो आणि त्याची शाळा सुटते. पण मनात धग पेटलेली की - ‘मी काय वाट्टेल ते करीन; प्रसंगी हमाली करेन, पण हा स्मशानभूमीतला प्रेत जाळण्याचा धंदा करणार नाही. पण सर्पदेशानं श्रीमतीचा अचानक मृत्यू होतो, तेव्हा त्याचा कुंभार मित्र मंग्या कुटुंबाला मदत करतो; मात्र तरुण विधवा यशोदावर त्याची नजर असते. त्याची जेव्हा किस्न्याला जाणीव होते, तेव्हा तो बापाचं काम करू लागतो, पण शाळेतही जिद्दीनं जाऊ लागतो व उसाच्या रसवंतीवरही पार्टटाईम काम करू लागतो. कारण मनात धग आहे की, लवकरात लवकर शिकून स्वावलंबी होऊन समाजाकडून हेटाळणीखेरीज काही न मिळणारा हा पिढीजात व्यवसाय सोडायचा... या आशावादी टप्प्यावर चित्रपट संपतो, तेव्हा सुन्न झालेला प्रेक्षक भानावर येतो... माझा हा दोन्ही वेळचा अनुभव आहे.
 तद्दन खोट्या, चकाकत्या, गुळगुळीत फॉर्म्युलाप्रधान भारतीय - खास करून बॉलिबुड - सिनेमाची चाकोरी ओलांडत खच्या भारताची कहाणी कलात्मकतेचा आव न आणता सांगणारे सिनेमे हिंदी व अनेक भारतीय भाषांत अलीकडे येऊ लागले आहेत. 'धग' हा त्यातला एक अत्यंत उजवा व साठाव्या राष्ट्रीय पारितोषिकांत उत्कृष्ट दिग्दर्शक (शिवाजी पाटील), उत्कृष्ट अभिनेत्री (उषा जाधव) व उत्कृष्ट बालकलाकार (हंसराज जगताप), अशी तीन पारितोषिके पटकावून गुणवत्ता सिद्ध केलेला - मला प्रचंड प्रभावित करून गेला आहे.

 मला 'धग' का प्रभावित करून गेला? - असा प्रश्न मी स्वत:ला विचारतो; तेव्हा पहिलं उत्तर येतं, ते म्हणजे याची सकस व अस्सल देशी कथा-पटकथा. दुसरं कारण - दिग्दर्शकानं मांडलेला प्रभावी जळजळता अनुभव. आणि तिसरं कारण - कलावंतांचा प्रभावी अभिनय न म्हणता मी असं म्हणेन की, भूमिका जगणं होतं ते - म्हणूनच हा सिनेमा केवळ प्रभावित करीत नाही; अस्वस्थ करतो व नकळत जातिव्यवस्थेवर

४५६ ■ लक्षदीप