पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/448

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणारी आहेत. हुसेन अली किरमाणी हा टिपूच्या मृत्यूनंतर त्याच्या आठवणी इंग्रजांसाठी लिहीत आहे, त्यातून हे नाटक उलगडत जाते. मृत्यूच्या छायेत टिपूला विजयाची स्वप्नं पडतात, ती नाटकातून दाखवताना त्याला एक वेगळे काव्यात्म परिमाण लाभले. ज्याप्रमाणे कर्ण व संभाजीला आधुनिक काळात न्याय देत त्यांना मराठी साहित्यांत नायकत्व बहाल झालं आहे, तसंच नायकत्व कार्नाडांनी या नाटकातून यशस्वीपणे टिपूबाबत केलं आहे. त्यातील ऐतिहासिक सत्य-असत्यता व त्याचा त्यांनी लावलेला अन्वयार्थ सर्वसान्य होईलच असा नाही, तरीही एक रसरशीत नाट्यानुभव हे नाटक प्रभावीपणे देते हे निर्विवाद. आदर्श राजकारण्यांकडे भविष्यात पाहायची दूरदृष्टी असली तरी किलर इन्स्टिंक्ट नसेल व सभोवती खुजे-स्वाथी व सत्तालोलुपी असतील तर अशा व्यक्तींची शोकांतिका अटळ असते, हे सार्वकालीन, विशेषत्वानं आजच्या वर्तमान भारतातील, राजकारणाचं सत्य यातून जोरकसपणे प्रत्ययास येतं!

 इतिहासातून पात्रे व घटना घेऊन रचलेलं गिरीश कार्नाडांचं बाराव्या शतकातील क्रांतिकारी संत बसवण्णा, ज्यांनी लिंगायत धर्म म्हणा - पंथ म्हणा - स्थापना केला,त्यांच्या जीवन व विचारावर आधारित ‘तलेदंडा' हे नाटक आहे. इतिहास व त्याचा आजच्या वर्तमानातली प्रस्तुतता हा गिरीश कर्नाडांना सदैव आकर्षित करणारा विषय आहे. व ‘तलेदंडा' हे त्याचं एक सुरेख उदाहरण. हे नाटक आलं १९९३ साल, जेव्हा भारतात मंडल कमिशन लागू झालं होतं व राम मंदिर आंदोलन सुरू झाल होत (ज्याचे पर्यवसन पुढे बाबरी मशिदीच्या विध्वंसात झालं) आणि धार्मिक उन्माद वाढत होता. या नाटकाच्या प्रस्तावनेत या भारताला भेडसावणाच्या घटनांचा उल्लेख करात कार्नाड लिहितात, “बसवण्णासारख्या विचारवंतांनी त्याकाळी उपस्थित केलेले प्रश्न आजही किती प्रस्तुत आहेत!' आज भारताला भेडसावणारा धार्मिक अतिरेकीवादाचा प्रश्न देशाचा पाया (एका अर्थाने the idea of india) कसा उद्ध्वस्त करीत आहे हे पाहिलं की (बसवण्णासारख्या) विचारवंतांनी शोधलेली उत्तरे दुर्लक्षित करण वा झिडकावणे किती धोकादायक आहे हे लक्षात येतं! आजच्या जाती व धर्मभेदाच्या कुरूपतेकडे लक्ष वेधताना नाटककारांचा सामाजिक न्याय व दलितांबद्दलच्या प्राथमिक कळवळा व सहानुभूती नाटकातून प्रगट होते. या नाटकाद्वारे जातीभेदाची अमानवीय अमानुषता, व धार्मिक उन्माद व धर्म-राजकारणाची अभद्र युती अशा अनेक बाबावर प्रकाशझोत टाकला असला तरी त्याची उत्तरं दिली नाहीत, असा काही टीकाकाराचा आक्षेप आहे, पण तो फारसा समर्पक नाही. कारण बसवण्णांचे विचार व कृती है उत्तर मन व बुद्धीने निखळतेने आपलं समाजमन स्वीकारत नाही, ही शोकांतिक आहे म्हणनच तलेदंडा' हे ऐतिहासिक नाटक आजच्या वर्तमान प्रश्नांशी जोडण्यात काना सर्वार्थाने यशस्वी झाले आहेत.

लक्षदीप ■ ४४७