पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/447

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऐतिहासिक नाटक म्हटलं पाहिजे!
 ‘टिपू सुलतानची स्वप्ने' हे नाटक तुघलक परंपरेतले दुसरं ऐतिहासिक नाटक,गिरीश कार्नाडांना नाटकासाठी एक ट्रिगर पाँईट लागतो. ‘तुघलक’ साठी तो त्यात पाच वर्षे नमाजबंदी आणली होती या घटनेनं दिला होता, तर टिपू सुलतानाच्या लिखितस्वरूपात ठेवलेल्या त्याच्या स्वप्नांच्या नोंदीनं दिला व त्यातून हे नाटक साकार झालं. टिपू हे एक गुंतागुंतीचं ऐतिहासिक पात्र आहे. स्वतः कार्नाडांनी नाटक सादर होताना पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं की, तो एक विचारी व दूरदर्शी बादशहा होता,तो कर्नाटकाचा एक सर्वोत्तम दंतकथा व लोककथांचा विषय झालेला हिरो होता. पण त्याच्याबाबत बरेच गैरसमज समाज जीवनात दृढ आहेत व बरंचसं असत्य पण लिहिलं गेलं आहे. कार्नाडांनी त्या पत्रकात परिषदेमध्ये हेही आवर्जून सांगितलं की, टिपूचा बराचसा कालखंड हा युद्धात व घोड्यावर बसण्यात गेला, तरीही त्यानं आपल्या स्वप्नांच्या गुप्त नोंदी लिखित ठेवल्या होत्या, एक सर्जनशील कलावंत म्हणून कार्नाडांनी इतिहास व त्याची स्वप्न यांची संगती लावून हे नाटक रचलं.
 गिरीश कार्नाडांनी या नाटकाद्वारे टिपूचं स्वप्नातून व्यक्त होणारं मानस व विचार आणि ब्रिटिशांशी त्याचा चाललेला अव्याहत लढा याचं काव्यात्म पातळीवर जाणारं द्वंद्व मांडलं आहे. अपर्णा भार्गव धारवाडकरांनी collected plays volume two च्या प्रास्ताविकात नाटकाचं मर्म नेमकेपणानं खालील शब्दात व्यक्त केलं आहे.
 'The image in the play of polity in crisis, both because adversary, earns the same potential for application to contemporary problem that has made the history of Tughlaq and Taledanda, Karmad interlineates Textualised history with legend, lore and memory because all these modes of transmission are germane to the story of Tipu.'

 कार्नाडांनी टिपूला नाटकात लोकांचा आवडता राजा, दंतकथा बनलेला महापराक्रमी योद्धा, प्रेमळ पिता, दूरदशी, स्वप्नाळू आणि त्याच वेळी धूर्त, कारस्थानी व सत्तेच्या राजकारणातला निपुण असलेला दाखवला आहे. गिरीश कार्नाडांच्या नाटकात हे नाटक एका विशेषासाठी इतर नाटकामध्ये उठून दिसते, ते म्हणजे यात ब्रिटिशांच्या वसाहतवादावर सटीक भाष्य आहे. पश्चिम विरुद्ध पूर्व, युरोप विरुद्ध युरोपियेतर, गोरे विरुद्ध काळे, वसाहतवादी विरुद्ध त्याचे बळी अशा विविध द्वंद्वांचं चित्रण कार्नाड या नाटकात ताकदीनं करतात. टिपूची शोकांतिका केवळ ब्रिटिशांनी त्याचं मैसूरचं साम्राज्य घेण्यात नाही, तर एका द्रष्ट्या व्हिजनरीच्या स्वप्नांच्या समाप्तीमध्ये होती.नाटकात कार्नाडांनी जी ब्रिटिश पात्रं रेखाटली ती वसाहतवाद्यांचे प्रतीक आहेत. ती तार्किक, धूर्त, निघृण व वंशवादी आहेत. ती ‘डिव्हाईड अँड रूल' चा अवलंब

४४६ ■ लक्षदीप