पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/446

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काळातील मूल्यांची घसरण, आदर्शवादाबाबतचा भ्रमनिरास कार्नाडांना सूचित करायचा होता.
 ‘मोहंमद बिन तुघलक' हे एक परस्परविरोधी भावना व विचार एकत्रित नांदत असणारं पात्र आहे. त्याच्यात एकीकडे आदर्शवाद तर दुसरीकडे व्यवहार-वाद होता. तो नंतर कमालीचा धूर्त व क्रूरकर्मी बनत गेला. कार्नाडांनी तुघलकाचे लोककल्याणकारी राजा ते क्रूरकर्मी राजा हे रूपांतर नाट्यपूर्ण रीतीने नाटकात दाखवले आहे.
 तुघलक हा इतिहासात ‘वेडा मोहम्मद' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामागे त्याचे दोन निर्णय कारणीभूत आहेत. एक म्हणजे राजधानी सर्व लोकांसकट दौलताबादला स्थलांतरित करणे व दुसरं म्हणजे तांब्याची नाणी चांदीऐवजी सुरू करणं. वडिलांनी नमाज पढताना मारल्यावर आपल्याला कोणी मारू नये म्हणून पाच वर्ष त्यान नमाजावर बंदी घातली होती. इकडे मुस्लीम मानसाविरुद्ध जात हिंदूचा जिझिया कर रद्द केला होता. त्याचा सॉक्रेटिस व प्लेटोचा अभ्यास होता. तो परस्परविरोधी वृत्तीचा सुरेख नमुना होता. तो जरा हुशार व आदर्शवादी होता, तसाच तो मनस्वी व लहरा, चंचल होता. या नाटकाचा एक मध्यवर्ती धागा आहे विश्वासघाताचा. हा विश्वासघात जसा नातेसंबंधाचा आहे, तसाच तो ध्येयवाद, विश्वास व मैत्रीचा आहे. तसाच धर्माचा पण आहे. त्यामुळे तुघलक हा मानसिक दृष्ट्या कमालीचा अस्थिर व दुबळा क्रमशः होताना दिसतो व तो समाज, नातेवाईक व खुद्द देवापासूनही अलग होत जातो. हा अलगतेची (alienation) ची भावना आधुनिक काळातील साहित्याची एक महत्त्वाची थीम आहे. तिचा सुरेख वापर कार्नाडांनी करून या नाटकाला एक कलात्मक उचा बहाल केली आहे.
 प्रतीकांचा वापर करून पात्रांना व कथानकाला खोली व उंची प्रदान करण है। गिरीश कार्नाडांची खासियत आहे. या नाटकात ती विपुल प्रमाणात आहे. तुघलकाचा निद्रानाश हे त्याच्या मनातील अस्वस्थ घालमेलीचं प्रतीक आहे. रात्री चंद्रप्रकाशात हिंडणं, त्याचं वेडसरपण व्यक्त करतं. तो स्वत:ची झाडाशी तुलना करतो, ज्याच्या फांद्या उंच व सर्व दूर पसरलेल्या असतात, पण मुळे जमिनीशी घट्ट रोवलला असतात. तो एकदा बोलताना स्वत:ला चिखलातलं डुक्कर म्हणावून घेता. जव्हा नमाजावरची बंदी तो पाच वर्षांनी उठवतो तेव्हा त्याला शांत झोप लागते, कारण मनाला अपूर्वशी शांती प्रतीत होत असते. सारांशरूपानं सांगायचं झालं तर खुद तुघलक हेही एक प्रतीक रूप बनून येतं - दुभंग व्यक्तिमत्त्वाचं. काळाच्या पुढे जाऊन पाहाणान्यांना समाज नेहमीच समजून न घेता वेडा म्हणतो. त्याचं तुघलक मृतिमा उदाहरण व कालौघात प्रतीक झालेलं!

 मराठीत ‘सवाई माधवरांचा मृत्यू' सारखं नाटक सोडलं तर वर्तमानाशी धागा जुळवत व आजच्या काळाचं प्रतिबिंब उमटलेलं ‘तुघलक' हे पाहिले भारतीय

लक्षदीप ■ ४४५