पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/441

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. पहिलं मिथक म्हणजे नागानं पुरुषाचं रूप घेऊन प्रेम करणं, तर दुसरं मिथक म्हणजे रात्रभर मंदिरात पापणीला पापणी न लावता जागून मृत्यू परतावता येतो. स्वतः कर्नाडांनी Author's introduction मध्ये असं म्हटलं आहे की, या नाटकातील राणीची स्थिती हे एकत्र संयुक्त कुटुंबातल्या तरुणीचं रूपक आहे. तिला नवरा दिवसा भिन्न रीतीने भेटत असतो, तर रात्री अगदी त्याच्याविरुद्ध. या नाटकातून पुरुषी इगो कसा स्त्री-पुरुष दोघांनाही कमकुवत बनवतो व कमीपणा आणतो हे प्रत्ययकारी रीतीने व्यक्त होते.
 या नाटकाची कहाणी मोठी रंजक व स्त्री मनाच्या सुप्त भावना, अवांछित अव्यक्त वासना चितारणारी आहे. राणीचा नवरा अपण्णा हा तिला दिवसा तेही दुपारी भोजनाच्या वेळी भेटत असतो व सारी रात्र वेश्येकडे घालवीत असतो. बाकी तिचं चारित्र्य शुद्ध राहावं म्हणून जगापासून लपवण्यासाठी तिला घरात बंद करून ठेवीत असतो. नव-याचं प्रेम मिळावं म्हणून शेजारची एक अंध स्त्री तिला दिव्य मुळी देते, पण त्याचा रस सांडल्यामुळे बिळातला नाग पितो व अपण्णाचं रूप धारण करून रात्री नवरा नसताना येऊन तिच्यावर प्रेम करतो - शरीरसंग करतो. त्यातून ती गर्भार राहते. अपण्णा त्यामुळे चिडतो. राणी आपलं पावित्र्य सिद्ध करताना म्हणते की, “मी केवळ तुम्हाला व नागाला स्पर्श केला आहे. नाग तिला न चावता तिच्या डोक्यावर फणा धरतो. या चमत्कारानं गावकरी तिला देवी मानू लागतात व अपण्ही तिला स्वीकारतो. नाग मात्र तिचा विरह सहन न झाल्यामुळे तिच्याच केसाचा फास घेऊन मरतो. राणीच्या इच्छेला मान देत तिचा मुलगा त्याचे अंत्यकर्म करतो.
 अशी ही कथा गिरीश कर्नाडांनी या नाटकात देशी रंगभूमीचा लवचीक फॉर्म वापरून मांडली आहे. तिचा विजया मेहतांनी मराठी व जर्मनीत प्रयोग केला, तो जबरदस्त रंगमंचाची जादुई मोहजालाप्रमाणे पसरणारा ठरला. आपल्या झिम्मा' या आत्मकथनात विजया मेहती ‘नागमंडल' बद्दल खालीलप्रमाणे लिहितात, त्यातून नाटकाचं सामर्थ्य, तसंच त्यांच्या मते असलेल्या मर्यादा स्पष्ट होतात.
 'नागमंडलाच्या लिखाणात गिरीशनं ब-याच गमती जमती केल्या होत्या. त्याच्या नाट्यभानविषयी मला नेहमीच आदरमिश्रित कौतुक वाटत आलंय, रंगमंचावर जादुई क्षण साकारण्याची त्याची क्षमता ‘नागमंडल' मध्ये ठायी ठायी डोकावत होती.

 प्रयोग सुरू होतो. मी आज मरणार आहे. नाटकात मरतात तसं नाही तर खरंखुरं मरणार आहे, हे नटाचं पहिलंच वाक्य. सगळे प्रेक्षक या वाक्यानं अक्षरश: गारद, त्याच्या मरणाची कथा साधी. प्रयोगातील नटाचा वाईट अभिनय पाहून प्रेक्षकांना डुलक्या येतात. त्या सगळ्या डुलक्या एकत्र येऊन नटाला मरणाचा शाप देतात. या भन्नाट कल्पनेतून प्रेक्षक सावरताहेत तोच आपापली कामं आटपून दिव्यांच्या ज्योती गप्पा मारण्यासाठी एकत्र जमतात. घासतेलाची वात. गोड्या तेलाची, कंदिलाची,

४४० ■ लक्षदीप